आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलिंग:चार सायकलिस्टनी 5 दिवस 18 तासांत गाठले 2351 किमी अंतर

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायगर मॅन स्पोर्ट््स प्रा. लिमिटेडच्या वतीने आयोजित काश्मीर ते कन्याकुमारी (के टू के) रेस अक्रॉस इंडिया स्पर्धा उत्साहात झाली. या शर्यतीत छत्रपती संभाजीनगरच्या चार सायकलपटूंनी खुल्या गटात ५ दिवस १८ तास ५० मिनिटाच्या विक्रमी वेळेत ३६५१ किलोमीटरची शर्यत पूर्ण केली.

भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षांवरील गटात सहभागी झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या संघात चरणजितसिंग संघा, अमोघ जैन, मनीष खंडेलवाल व निखिल कचेश्वर यांचा सहभाग होता.

हे चारही जण सायकलिंगमध्ये मास्टर आहेत. एसआर, बीएमआर, घाट का राजा अशी अनेक बिरुदे त्यांच्या नावे लागलेली आहेत. ही स्पर्धा विविध चार गटांत होत असून औरंगाबादची टीम सांघिक चार जणांच्या रिले प्रकारात रस्त्यावर उतरली होती. आणखी चार दिवस ही स्पर्धा चालणार आहे. अत्यंत कठीण अशी स्पर्धा होती. वातावरणाचादेखील यावर परिणाम झाला. काश्मीरमध्ये प्रचंड थंडी, तर दक्षिणेत प्रचंड गरमी होती. डोंगररांगा, घाट, वळणाचे रस्ते, जड वाहतूक अशा गोष्टींचा सामना त्यांना करावा लागला. स्पर्धकांनी जेवण व झोप चारचाकीत घेतली. ही आशियाई खंडातील पहिलीच लांब पल्ल्याची स्पर्धा असल्याचा दावा आयोजक नागपूरच्या डॉ. अमित समर्थ यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...