आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Four Cyclists From Nashik Completed The Ashtavinayak Cycle Yatra For The Second Consecutive Year In 48 Hours

सायकल यात्रा:नाशिकच्या चार सायकलिस्टची 48 तासांत सलग दुसऱ्या वर्षी अष्टविनायक सायकल यात्रा

नाशिक रोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या बजरंग कहाटे, दिनकर पाटील, प्रमोद तुपे आणि संजय पवार या चार सदस्यांनी अवघ्या ४८ तासांत अष्टविनायक यात्रा यशस्वी केली. राजेंद्र वानखेडे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या अष्टविनायक यात्रेचे हे दुसरे वर्ष होते. अष्टविनायक सायकल यात्रेसाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या चार सदस्यांनी ५०० किलोमीटर सायकलिंग, ३५० किलोमीटर बॅकअप वाहनाद्वारे नाशिक- अष्टविनायक-नाशिक अशी यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.

अष्टविनायक यात्रा करताना या चार सायकलिस्टनी डोंगरातील चढ-उताराचे रस्ते आणि पावसाचे संकट झेलत ही यात्रा केली. यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने, जगन्नाथ पवार, सचिन नरोटे, नलिनी कड, अरुण पवार, संजय बारकुंड, किशोर काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...