आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा:सुकांत कदमसह चार भारतीय खेळाडू फायनलमध्ये

पेरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेल्या सुकांत कदमसह भारताच्या चार खेळाडूंनी विजयी माेहीम कायम ठेवताना रविवारी पेरू आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेची फायनल गाठली. यामध्ये निथया, मनदीप आणि नेहाल गुप्ताचा समावेश आहे. भारताच्या या सर्वांना आता किताबाची संधी आहे. यापासून भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू अवघ्या एका पावलावर आहे. दरम्यान, भारताच्या सुमीतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याला पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सुकांत कदमने एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये ग्वाटेमालाच्या राऊलवर मात केली. त्याने २१-१०, २१-१२ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. त्यापाठाेपाठ निथयाने एकेरीच्या लढतीत पाेलंडच्या ओलिव्हियाला सरळ गेममध्ये धूळ चारली. त्याने २१-१७, २१-७ ने उपांत्य सामना जिंकला. मनदीपने आपल्याच देशाच्या पारूलचा पराभव केला. यासह त्याने अंतिम फेरी गाठली.

बातम्या आणखी आहेत...