आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सविरोधातील पराभवामुळे मोरक्कोचे चाहते हिंसक:पॅरीसच्या रस्त्यांवर फ्रान्सचे सपोर्टर व पोलिसांशी चकमक, वाहनांची जाळपोळ ​​​​​​​

अल बैतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सच्या विजयानंतर मोरक्कोच्या चाहत्यांनी ठिकठिकाणी गोंधळ घातला.

फीफा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये फ्रान्सविरोधात पराभवाची चव चाखावी लागल्यामुळे मोरक्कोचे चाहते हिंसक झालेत. त्यांनी ब्रसेल्स व पॅरीसमध्ये मोठा हिंसाचार केला आहे. एवढेच नाही तर फ्रान्समध्ये त्यांची अनेक ठिकाणी फ्रान्सच्या चाहत्यांसोबत चकमकही झाली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, मोरक्कोचे फॅन्स ब्रसेल्सच्या साउथ स्टेशनवर गोळा झाले होते. त्यांनी येथे जाळपोळ केली. अनेक ठिकाणी पोलिसांना अश्रूधूर व पाण्याचा मारा करावा लागला. पोलिसांनी या प्रकरणी मोरक्कोच्या काही फॅन्सनाही अटक केली आहे. पॅरीसमध्येही फ्रान्सच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांची मोरक्कोच्या चाहत्यांशी चकमक झाली. बुधवारी रात्री उशिरा फ्रान्स व मोरक्कोत झालेल्या सेमीफायनमध्ये मोरक्कोचा 2 विरुद्ध 0 अशा गोलने पराभव झाला.

3 फोटोंत पाहा...जाळपोळ, हिंसाचार

हे छायाचित्र ब्रसेल्सच्या साउथ स्टेशनचे आहे. येथे जाळपोळ झाली होती.
हे छायाचित्र ब्रसेल्सच्या साउथ स्टेशनचे आहे. येथे जाळपोळ झाली होती.
पॅरीसमध्येही मोरक्कोच्या चाहत्यांनी हिंसाचार केला. आनंद साजरा करणारे लोक एकमेकांशी भिडले.
पॅरीसमध्येही मोरक्कोच्या चाहत्यांनी हिंसाचार केला. आनंद साजरा करणारे लोक एकमेकांशी भिडले.
जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

फ्रान्स सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये

फ्रान्स सलग दुसऱ्यांदा फूटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. संघाने 2018मध्ये विश्वचषक जिंकला होता. दुसरीकडे, विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रथमच पोहोचणाऱ्या आफ्रिकन संघ मोरक्कोचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. यामुळे आफ्रिकन देश व अरब राष्ट्रांच्या आशा-अपेक्षाही संपुष्टात आल्या आहेत.

बेल्जियम, स्पेन व पोर्तुगाल सारख्या मोठ्या संघंना पराभवाची धूळ चारल्यानंतर मोरक्कोला सेमीफायनलमध्ये फ्रान्सविरोधात फारशी चकमक दाखवता आली नाही. फ्रान्सकडून 5 व्या मिनिटाला थियो हर्नांडेज व 79 व्या मिनिटाला रँडल कोलो मुआनीने गोल केला. मोरक्कोला भोपळाही फोडता आला नाही.

पहिला गोल

फ्रान्सने सामन्याच्या 5 व्या मिनिटाला गोल केला. संघाचा मिडफील्डर थियो हर्नांडेजने हा गोल केला. फ्रान्सचा प्लेयर ग्रीजमेन बॉलला आतपर्यंत घेऊन आला. त्याने तो बॉल एम्बाप्पेकडे टोलवला. तेवढ्यात मोरक्कोच्या खेळाडूंनी बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बॉल पुन्हा हर्नांडेजकडे आला. त्यानंतर कोणतीही चूक न करता हर्नांडेजने बॉल नेटच्या आत पोहोचवला.

हर्नांडेजने बॉलची उंची ओळखत एक्रोबॅटिक शॉट मारला.
हर्नांडेजने बॉलची उंची ओळखत एक्रोबॅटिक शॉट मारला.
या विश्वचषकात थियो हर्नांडेज मोरक्कोविरोधात गोल करणारा पहिला खेळाडू ठरला.
या विश्वचषकात थियो हर्नांडेज मोरक्कोविरोधात गोल करणारा पहिला खेळाडू ठरला.

दुसरा गोल

फ्रान्सचा रँडल कोलो मुआनीने मैदानात उतरताच गोल डागला. मुआनी दुसऱ्या डावाच्या 79 व्या मिनिटाला ओस्मान डेम्बेलेच्या जागी मैदानात उतरला. त्यानंतर लगेचच म्हणजे 79 व्या मिनिटालाच एम्बाप्पेच्या पासवर त्याने गोल केला. हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला.

फ्रान्सच्या मोआनीने सेमीफायनलमध्ये दुसरा गोल स्कोअर केला.
फ्रान्सच्या मोआनीने सेमीफायनलमध्ये दुसरा गोल स्कोअर केला.
फ्रान्सच्या रँडल कोलो मुआनीने 79 व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
फ्रान्सच्या रँडल कोलो मुआनीने 79 व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

65 व्या मिनिटाला जीरूड सब्स्टीट्यूट

सामन्याच्या 65 व्या मिनिटाला फ्रान्सचा खेळाडू ओलिव्हर जीरूड सब्स्टीट्यूट होऊन बाहेर पडला. त्याच्या जागी मार्कस थुराम मैदानात उतरला. जीरूडने वर्ल्ड कपमध्ये 4 गोल केलेत.

मोरक्कोच्या अनेक संधी हुकल्या

सामन्यात मोरक्कोच्या खेळाडूला अनेक संधी मिळाल्या. पण त्याचे त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. लीड घेतल्यानंतर फ्रान्सने मोरक्कोला अनेक संधी दिल्या. पण गोल करू दिला नाही. संपूर्ण सामन्यात मोरक्कोने गोल पोस्टच्या दिशेने तब्बल 13 शॉट मारले. पण, फ्रान्सने दुसऱ्या डावात आक्रमक भूमिका घेत गोल पोस्टकडे त्याहून जास्त 14 शॉट मारले. दोन्ही संघांचे 3 शॉट टार्गेटवर लागले. मोरक्कोने बॉल पजेशन 62% वेळा आपल्याकडे ठेवला. तर फ्रान्सने 38% वेळा बॉल ठेवला. मोरक्कोने 11 व फ्रान्सने 10 फाउल केले.

पहिल्या डावात फ्रान्स वरचढ

पहिल्या डावात फ्रान्सने गेम डोमिनेट केला. त्याने 9 शॉट गोलकडे मारले. तर मोरक्कोले असे 5 वेळाच करता आले. त्यात फ्रान्सने एका शॉटवर गोलही केला. पजेशन मोरक्कोकडे सर्वाधिक होती. 58 टक्के वेळा स्वतःकडे बॉल ठेवल्यानंतरही त्यांना तो हाफ वे लाइनच्या पुढे नेता आला नाही. फ्रान्सने काउंटर अटॅक करून गोल करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सने फर्स्ट हाफमध्ये 7 फाउल केले. तर मोरक्कोने 3 फाउल केले.

सामन्याच्या 52 व्या मिनिटाला एम्बाप्पे गोल करण्यासाठी धावला. पण डिफेंडरने त्यांना बॉक्समध्ये टॅकल केल्याने तो कोसळला. मेडिकल सुपरव्हिजननंतर त्याने आपला खेळ सुरू ठेवला.
सामन्याच्या 52 व्या मिनिटाला एम्बाप्पे गोल करण्यासाठी धावला. पण डिफेंडरने त्यांना बॉक्समध्ये टॅकल केल्याने तो कोसळला. मेडिकल सुपरव्हिजननंतर त्याने आपला खेळ सुरू ठेवला.
सामन्यानंतर फ्रान्सच्या कीलियन एम्बाप्पेने आपला मित्र व मोरक्कोचा खेळाडू हकीम जिएचचे सांत्वन केले.
सामन्यानंतर फ्रान्सच्या कीलियन एम्बाप्पेने आपला मित्र व मोरक्कोचा खेळाडू हकीम जिएचचे सांत्वन केले.

दोन्ही संघांचे स्टार्टिंग इलेव्हन

फ्रान्स (4-2-3-1): ह्यूगो लॉरिस (गोलकीपर), जूलियस कौंडे, राफेल वराने, इब्राहिमा कोनाटे, थियो हर्नांडेज, अँटोनी ग्रीजमैन, ऑरेलियन टॉचमनी, यूसुफ फोफाना, ओस्मान डेम्बेले, ओलिवर जीरूड और कीलियन एम्बाप्पे.

मोरक्को (5-3-1): यासीन बोनो (गोलकीपर), अशरफ हकीमी, जवाद एल यामीक, नायेफ एगुएर्ड, रोमेन सॅस (कर्णधार), नूस्सैर मोजरई, सोफियान अमरबात, हाकिम जिएच, एजेदीन औनाही, सौफियाने बौफाल और यूसुफ एन-नेसरी.

बातम्या आणखी आहेत...