आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दावेदार संघाचे आज पॅकअप:किताबाचा प्रबळ दावेदार फ्रान्स-इंग्लंड आज सामना, पाेर्तुगालसमाेर असेल माेराेक्काेचे आव्हान

दाेहा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चारही संघ आता शनिवारी मध्यरात्रीपर्यंत निश्चित हाेणार आहेत. यादरम्यान एका दावेदार संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे. यादरम्यान पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये गत चॅम्पियन फ्रान्स आणि इंग्लंड संघ झुंजणार आहेत. त्यानंतर राेनाल्डाेच्या पाेर्तुगाल संघाला चमत्कारिक खेळी करणाऱ्या माेराेक्काे टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. हे दाेन्ही संघ अंतिम आठच्या सामन्यामध्ये समाेरासमाेर असतील.

मोराेक्को Vs पाेेर्तुगाल सनसनाटी विजय मिळवण्यात आफ्रिकन संघ अधिक तरबेज

माेराेक्काे संघाने पहिल्यांदाच अंतिम आठचा पल्ला गाठला आहे. या आफ्रिकन संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संघाने एकही सामना न गमवता अंतिम आठमध्ये प्रवेश केला. यादरम्यान माेराेक्काे संघाने बलाढ्य संघांविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंेद केली आहे. त्यामुळे आता पाेर्तुगाल संघाविरुद्धही आपली सनसनाटी विजयाची लय कायम ठेवण्याचा माेराेक्काे संघाचा मानस आहे. धक्कादायक निकाल लावण्यात माेराेक्काे संघ अधिकच तरबेज मानला जाताे.

प्लेयर्स टू वाॅच { माेराेक्काे संघाकडून यासिन बाेनाेऊ फाॅर्मात आहे. त्याने बलाढ्य स्पेनचे गाेल करण्याचे प्रयत्न वेळाेवेळी हाणून पाडले. त्यामुळे आता त्याच्यावर एेतिहासिक विजयाची मदार असेल.

{ पाेर्तुगालच्या विजयाची मदार गाेंसालाे रामाेसवर असेल. त्याची गत सामन्यातील कामगिरी काैतुकास्पद ठरली हाेती. त्याने हॅट््ट्रिक साजरी करत संघाला विजय मिळवून दिला हाेता.

स्ट्रॅटेजी काॅर्नर { माेराेक्काे गत सामन्यात ४-३-३ फाॅर्मेशनने खेळला हाेता. आता याच्या बळावर पाेर्तुगालला धूळ चारण्याचा संघाचा मानस आहे. { पाेर्तुगालला ४-३-३ फाॅर्मेशनने आठचा पल्ला गाठता आला. आता नव्या फाॅर्मेशनचा वापर करत संघ मैदानावर उतरणार आहे.

कोच Vs कोच { माेराेक्काेचे काेच वालिद यांनी खास डावपेच आखले पाेर्तुगालचे आव्हान परतावून लावण्यासाठी आम्ही कसून मेहनत केली आहे. { पाेर्तुगाल संघाचे प्रशिक्षक फर्नांडाे सांताेसने माेराेक्काेला राेखण्यासाठी विशेष डावपेच आखले व डिफेन्स मजबूत करण्याचा सल्ला दिला.

फ्रान्स Vs इंग्लंड फ्रान्सच्या आक्रमणासमाेर इंग्लंडचा तगडा डिफेन्स फ्रान्स आणि इंग्लंड संघांना यंदा किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. अंतिम आठचा पल्ला गाठत या संघांनी आपली क्षमताही सिद्ध केली. आता या दाेन्ही दावेदारांपैकी एकालाच पुढची फेरी गाठता येणार आहे. त्यामुळे गतचॅम्पियन फ्रान्स संघाच्या सरस आक्रमणाला परतावून लावण्यासाठी इंग्लंडची डिफेन्सची मजबूत भिंत सज्ज झाली आहे. हॅरी केनचा इंग्लंड संघाला विजयासाठी एमबापेच्या वेगाला राेखण्याची गरज आहे. सध्या एमबापे प्रचंड वेगाने संघासाठी गाेल करत आहे. यातून फ्रान्सच्या विजयाची मदार या ग्लाेबल स्टार खेळाडूवर आहे.

प्लेयर्स टू वाॅच { इंग्लंडचा कर्णधार केनने ४ सामन्यांनंतर वर्ल्डकपमध्ये गाेलचे खाते उघडले. ताे गाेलसाठीची पाेषक स्थिती निर्माण करण्यात तरबेज आहे. त्याने तीन असिस्टही केले आहे.

{ फ्रान्स संघाचा २३ वर्षीय किलियन एमबापेकडून माेठी आशा आहे. आपल्या वेगवान पदतालित्याच्या बळावर ताे प्रतिस्पर्धी टीमच्या डिफेन्सला भेदण्यात तरबेज आहे. त्याच्यात इंग्लंडचा डिफेन्स भेदण्याची प्रचंड क्षमता आहे.

स्ट्रॅटेजी काॅर्नर { फ्रान्स संघाने गत सामन्यात ४-२-३-१ फाॅर्मेशनने विजय मिळवला. आता यावरच विश्वास ठेवण्याची आता संघाने तयारी दर्शवली. { इंग्लंड संघाने आपला ४-३-३ या एकाच फाॅर्मेशनवर विश्वास ठेवत आगेकूच कायम ठेवली. आताही टीमला विश्वास आहे.

कोच Vs कोच { इंग्लंड संघाचे काेच गारेथ साऊथगेट यांनी फ्रान्स टीमला बलाढ्य मानले आहे. { फ्रान्स संघाचे प्रशिक्षक डिडियर यांनी आपल्या फाॅरवर्ड एमबापेकडून खास तयारी करून घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...