आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • France Out Of Finals Race With Defeat; The Entry Of The Croatia Team Is Confirmed

नेशन्स लीग:पराभवाने फ्रान्स फायनलच्या शर्यतीतून बाहेर; क्राेएशिया संघाचा प्रवेश निश्चित

काेपेनहेगन8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅस्पर डाेल्बर्ग (३३ वा मि.) आणि आद्रियास स्काेवओलसेन (३९ वा मि.) यांनी सर्वाेत्तम कामगिरीतून डेन्मार्क संघाला साेमवारी नेशन्स लीगमध्ये सनसनाटी विजय मिळवून दिला. संघाने लढतीत विश्वविजेत्या फ्रान्स संघाला धूळ चारली. डेन्मार्क संघाने २-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह संघाला आपला दबदबा कायम ठेवताना एकतर्फी विजयाची नाेंद केली. या लढतीतील पराभवाने फ्रान्स संघाला पुढच्या वर्षी हाेणाऱ्या फायनलच्या शर्यतीत रेड कार्ड मिळाले. या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळणार नाही. दुसरीकडे क्राेएशिया संघाने आपला प्रवेश निश्चित केला. या संघाने सामन्यात ऑस्ट्रियाला ३-१ ने पराभूत केले.

एकतर्फी विजयाने डेन्मार्क संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी धडक मारली. टीमच्या नावे १२ गुणांची नाेंद झाली आहे. फाॅर्मात असलेल्या क्राेएशिया संघाने पुढच्या वर्षी हाेणाऱ्या फायनलचे तिकीट मिळवले. टीमने लढतीत ऑस्ट्रियाला ३-१ ने पराभूत केले. लुका माेड्रिच (६ वा मि.), मार्काे लिवाजा (६९ वा मि.) आणि देजान लाेवरेन (७२ वा मि.) यांनी सर्वाेत्तम खेळीतून क्राेएशियाचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रिया संघासाठी क्रिस्टाेफ बाॅमगार्टनरने (९ वा मि.) एकमेव गाेल केला. मात्र, इतरांच्या सुमार खेळीने टीमला पराभवाचा सामना करावा लागला.

यजमान हाॅलंड संघाने घरच्या मैदानावर दणदणीत विजय संपादन करून फायनलमधील प्रवेश निश्चित केला. यजमान टीमने लढतीत बेल्जियमचा १-० ने पराभव केला. वर्जिल वान डिकने ७३ व्या मिनिटाला गाेल केला.