आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत चॅम्पियन फ्रान्स संघाला आता सलग दुसऱ्यादा विश्वविजेता हाेण्याची संधी आहे. यासह टीमला आता ६० वर्षांपूर्वीच्या पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलच्या विक्रमाशी बराेबरी साधण्याची संधी आहे. फ्रान्स सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा दाेन दशकातील पहिलाच संघ ठरला. यापूर्वी ब्राझील संघाने १९९४, १९९८ आणि २००२ मध्ये सलग तीन वेळा वर्ल्डकपची फायनल गाठली हाेती. गत स्पर्धेत फ्रान्स संघाने फायनलमध्ये क्राेएशियावर मात केली.
यासह फ्रान्स संघ विश्वविजेता ठरला हाेता. या जगज्जेत्या संघातील चारच खेळाडू हे सध्याच्या फ्रान्स टीमचे सदस्य आहेत. यामध्ये अँटाेनी ग्रीजमॅन, आेलिव्हर जिरू, किलियन एमबापे व ह्युगाे लाॅरिसचा समावेश आहे. सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठणारा फ्रान्स हा पाचवा फुटबाॅल संघ ठरला. यापूर्वी ब्राझील (१९५८-६२), इटली (१९३४-३८), हाॅलंड (१९७४-७८), वेस्ट जर्मनी (१९८२-८६, ९०) यांनी हे यश संपादन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.