आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Frech Open Champion Updates: Jokovic Won The Tournament For The Second Time; The First To Win All Four Grand Slams Twice; News And Live Updates

फ्रेंच ओपन चॅम्पियन:जोकोविचने दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा; चारही ग्रँडस्लॅम दोन वेळा जिंकणारा पहिलाच

पॅरिस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच वर्षांनंतर फ्रेंच ओपन ट्राॅफीवर नाव

जगातील अव्वल टोनिसपटू नोवाक जोकोविचने रविवारी आपल्या कारकीर्दीत फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावून या अजिंक्यपदावर दुसऱ्यांदा नाव कोरले. टेनिस जगतात सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून ओळखले जाणारे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनाही हे यश अद्याप मिळवता आलेले नाही. चारही ग्रँडस्लॅमचे (ओपन एरा -१९६८ नंतर) किमान दोन वेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच पहिला खेळाडू ठरला.

३४ वर्षीय जोकोविचने अंतिम लढतीत २२ वर्षीय स्टिफानोस सितसिपासला ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ अशा सेट्सनी पराभूत केले. जोकोविचचा हा १९वा ग्रँडस्लॅम किताब आहे. आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकला की जोकोविच फेडरर व नदाल यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. या दोघांनी २० ग्रँडस्लॅम जिंकलेले आहेत. मूळ सर्बियाच्या जाेकोविचला १२.४१ कोटी आणि उपविजेता सितसिपासला ६.६५ कोटी रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

१९ ग्रँडस्लॅम किताबाचा मानकरी
सर्बियाचा जाेकाेविच करिअरमध्ये अाता १९ ग्रँडस्लॅम किताबाचा मानकरी ठरला अाहे. यामध्ये त्याने अातापर्यंत अाॅस्ट्रेलियन अाेपनचे ९, फ्रेंच अाेपनचे २, विम्बल्डनचे पाच अाणि अमेरिकन अाेपनचे ३ वेळा विजेतेपद पटकावले अाहे. त्याने करिअरमध्ये सर्वाधिक ९ वेळा अाॅस्ट्रेलियन अाेपनमध्ये चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला अाहे.

बारबरा ठरली डबल ग्रँडस्लॅम चॅम्पियन
झेक गणराज्यची बारबरा क्राजिकोवाने फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचा किताब जिंकला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. दुसऱ्या मानांकित बारबरा व कॅटरिनाने २०२० च्या एकेरीची चॅम्पियन इगा स्वातेक व बेथानी माटेक सेंड्स जोडीला ६-४, ६-२ ने हरवले.

पाच वर्षांनंतर फ्रेंच अाेपन ट्राॅफीवर नाव
जाेकाेविचने ५ वर्षांनंतर क्ले काेर्टवर ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने २०१६ मध्ये या स्पर्धेचा किताब जिंकला हाेता. यासह ताे अातापर्यंत करिअरमध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन ठरला अाहे. अाता दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मानकरी हाेण्यासाठी त्याने क्ले काेर्टवरील किंग नदालला धूळ चारली हाेती.

बातम्या आणखी आहेत...