आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • French Open Rafael Nadal Victory Birthday Celebration; Serena Chaithya In The Round

फ्रेच ओपन:राफेल नदालचे विजयाने बर्थडे सेलिब्रेशन; सेरेना चाैथ्या फेरीत

पॅरिस17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्ले काेर्टवर आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या माजी नंबर वन राफेल नदालने ३५ व्या वर्षात दिमाखदारपणे पदार्पण केले. हा आपला वाढदिवसही त्याला अविस्मरणीय ठेवता आला. त्याने सत्राच्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील विजयाने आपल्या बर्थ डेचे जल्लाेषात सेलिब्रेशन केले. सलग चार वेळच्या चॅम्पियन नदालने पुरुष एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटवर मात केली. त्याने ६-०, ७-५, ६-२ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने १७ व्यांदा या स्पर्धेची तिसरी फेरी गाठता आली. याच विजयातून त्याने आता आपला किताबाचा दावा मजबूत केला. आता त्याचा तिसऱ्या फेरीतील सामना इंग्लंडच्या कॅमरून नाेरीशी हाेणार आहे. माजी नंबर वन व्हिक्टाेरिया अझारेंका, अनास्तासिया पावल्यूचेंकाेवा व एलिना राइबकिनाने महिला एकेरीच्या गटात आगेकूच केली. दाेेन वेळच्या आॅस्ट्रेलियन चॅम्पियन अझारेंकाने दुसऱ्या फेरीमध्ये अमेरिकेच्या किज मेडिसनला ६-२, ६-२ ने सरळ दाेन सेटमध्ये पराभूत केले.

सेेरेनाचा ग्रँडस्लॅममध्ये ३६५ वा विजय; सातव्या मानांकित सेरेनाने करिअरमध्ये ग्रँडस्लॅमचा ३६५ वा विजय शुक्रवारी साकारला. तिने राेस काेेलिन्सवर ६-४, ६-४ ने विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित आर्यना सबालेंकाला महिला एकेरीच्या गटातून पॅकअप करावे लागले. तिला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पावल्यूचेंकाेवाने ६-४, २-६, ६-० ने सबालेंकावर मात केली.

बातम्या आणखी आहेत...