आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये आशियाई ताकद:उलटफेर - जपानकडून जर्मनीचा, द. कोरियाकडून पोर्तुगालचा पराभव

दोहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी आशियाई ताकद पाहायला मिळाली. जपान व द. कोरियाने आपाaपल्या सामन्यांत मोठे उलटफेर केले. दोन्ही संघ अंतिम-१६ मध्ये पोहोचले. २४व्या क्रमांकाच्या जपानने स्पेनला २-१ ने नमवले तर २०१० चा चॅम्पियन स्पेन पराभूत होऊनही अंतिम-१६ मध्ये पोहोचला. स्पेनच्या मोराटाने ११व्या मिनिटाला गोल करत स्पेनला १-० ची बढत मिळवून दिली. जपानने पुनरागमन करत ४८व्या मिनिटाला गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. नंतर तनाकाने ५१व्या मिनिटाला गोल करत २-१ ने विजय मिळवून दिला. तनाकाचा हा गोल वादग्रस्त ठरला.

व्हीएआरने यामुळे मान्य केला गोल {जपान सातव्यांदा वर्ल्डकपमध्ये खेळतोय. चौथ्यांदा अंतिम-१६ मध्ये स्थान मिळवले. लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम-१६ मध्ये पोहोचला. आता सामना क्रोएशियासोबत होईल.

{५१व्या मिनिटाला चेंडू टचलाइनवर होता तेव्हा जपानच्या काओरू मितोमाने शॉट मारला व फुटबॉल जाळीसमोर पोहोचवला. येथून तनाकाने कट करत चेंडू गोल पोस्टमध्ये टाकला. {पंचांनी हा गोल दिला नाही. निर्णय व्हीएआर तंत्रज्ञानाकडे गेला. बॉल टचलाइनच्या बाहेर होता. म्हणजे तो आऊट ऑफ प्ले झाला होता. मात्र, व्हीएआरने निर्णय फिरवला. चेंडू हवेत होता आणि ९० अंशाच्या कोनातून पाहिल्यास त्याचा काही भाग लाइनच्या वर होता, असे व्हीएआरने मान्य केले.

बातम्या आणखी आहेत...