आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • From Today The World Of Sports Lovers...GoSSSal ; The Champion Will Be Announced On December 18

फुटबॉलचा कुंभमेळा:आजपासून क्रीडाप्रेमींचे जग...गोSSSल ; 18 डिसेंबरला मिळणार चॅम्पियन

कतार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी यजमान कतार व इक्वाडोर यांच्यातील सामन्याने फिफा विश्वचषकाच्या २२ व्या सत्राला सुरुवात होईल. जवळपास एक वर्ष पात्रता सामने खेळल्यानंतर ३२ संघ कतारला पोहाेचले आणि विजयाच्या अपेक्षेने मैदानात उतरतील. सर्वसाधारणपणे विश्वचषक उन्हाळ्यात होतो, मात्र मिडल ईस्टमधील या देशात भीषण उष्णता असल्याने प्रथमच ही स्पर्धा हिवाळ्यात घेतली जात आहे. २९ दिवस चालणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्यातील सुरुवातीचे सामने राउंड रॉबिन प्रकारात होतील, ज्यात ३२ संघांची ८ गटात विभागणी केली आहे. प्रत्येक गटात ४ संघ आहेत, जे आपसात १-१ सामने खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ प्री क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरतील. संघाला विजयानंतर ३ गुण आणि ड्रॉवर १ गुण मिळेल. पाहुयात प्रत्येक गटातील कोणते संघ ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बाद फेरीत पोहोचतील...

बातम्या आणखी आहेत...