आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gaikwad As President Of State Handball Association, Rajendra Raut As Secretary, Dr. Of Osmanabad. Mahesh Rajenimbalkar Executive Member

दिव्य मराठी विशेष:राज्य हँडबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी गायकवाड, सचिवपदी राजेंद्र राऊत, उस्मानाबादचे डॉ. महेश राजेनिंबाळकर कार्यकारिणी सदस्य

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुंबईच्या रवींद्र गायकवाड यांची अध्यक्षपदी, तर महासचिवपदी राजेंद्र राऊत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. रूपेश मोरे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक जवंजाळ, निरीक्षक म्हणून हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष आनंदेश्वर पांडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कोशाध्यक्ष अॅड. धनंजय भोसले यांनी काम पाहिले. संघटनेवर उपाध्यक्ष रूपेश मोरे यांच्या गटाने वर्चस्व राखले आहे. ते स्वत: उत्कृष्ट खेळाडू होते. आता संघटनेच्या माध्यमातून खेळाचा प्रचार व प्रसार आणि विकासासाठी झटत आहे.

संघटनेचे नूतन पदाधिकारी : अध्यक्ष - रवींद्र गायकवाड (मंुबई), सचिव - राजेंद्र राऊत (पुणे), वरिष्ठ उपाध्यक्ष - रूपेश मोरे (पुणे), उपाध्यक्ष - शंकर शहाणे (परभणी) सहसचिव - सुनील सुरकुटे (लातूर), सदस्य - प्रा. एकनाथ साळुंके (औरंगाबाद), डॉ. महेश राजेनिंबाळकर (उस्मानाबाद), भालचंद्र पवार (परभणी), कुलदीप सावंत (उस्मानाबाद), नाना साबळे (बीड), विलास नागेश्ववर (नांदेड), बळवंत निकुंब (नंदुरबार), रविकिरण सुरूडकर (सिंधुदुर्ग).

बातम्या आणखी आहेत...