आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:आयपीएल स्थगितीने कमबॅक धाेक्यात, धाेनीला गंभीरचा सल्ला; धाेनीच्या जागी आता लाेकेश राहुलचा पर्याय

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ‘लाॅकडाऊनमुळे सध्या काेणत्याही स्पर्धा प्रत्यक्षात मैदानावर खेळणे कठीण झाले आहे

यंदा आयपीएल स्थगितीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचे क्रिकेट करिअर धाेक्यात येणार असल्याचे संकेत टीम इंडियाच्या माजी खेळाडू गाैतम गंभीरने दिले. आयपीएल यंदा न झाल्यास धोनीला संघात पुनरागमन करणे कठीण होईल. जुलै महिन्यात वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धोनीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  दीर्घ विश्रांतीमुळे इतके दिवस क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर धोनीला परत येणे कठीण होत आहे, असे यापूर्वीच  गावसकर आणि कपिलदेवने करताना स्पष्ट केले. 

‘लाॅकडाऊनमुळे सध्या काेणत्याही स्पर्धा प्रत्यक्षात मैदानावर खेळणे कठीण झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये यंदाची आयपीएल हाेणे अवघड आहे. त्यामुळे धाेनीच्या विश्वचषकासाठी संघातील निवडीबाबत अनेक प्रश्न निर्माण हाेतील. काेणत्या अाधारावर निवड समिती त्याची संघात निवड करेल, असाही प्रश्न आहे. त्यामुळे त्याला आपल्याला सिद्ध करण्याची आता काेणत्याही प्रकारची संधी उपलब्ध नाही.’ असे गंभीर म्हणाला.

निवड समितीसाेबत चर्चा 

माजी स्पिनर सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीला धोनीबरोबर त्याच्या भविष्याविषयी चर्चा करावी लागेल, असे लक्ष्मण यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...