आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Game Over For Four time Champions Germany; Even After 3 Goals In 16 Minutes, The Challenge Ends

चार वेळच्या विजेत्या जर्मनीचा गेम ओव्हर:16 मिनिटांमध्ये 3 गाेल केल्यानंतरही आव्हान संपुष्टात

अल खाेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनी संघाचा फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील गेम ओव्हर झाला आहे. जर्मनी संघाने गटातील सामन्यात काेस्टारिकावर ४-२ अशा फरकाने मात केली. गनब्री (१० वा मि.), हार्वेटझ (७३, ८५ वा मि.) आणि फुलक्रुग (८९ वा मि.) यांनी सरस खेळीतून जर्मनीला माेठा विजय मिळवून दिला. काेस्टारिका संघाकडून तेेगेदाने (५८ वा मि.) एकमेव गाेल केला. मात्र, जर्मनीच्या नेऊरने काेस्टारिकाच्या नावे दुसऱ्या गाेलची नाेंद केली. त्याने ७० व्या मिनिटाला आत्मघाती गाेल केला. मात्र, राेमहर्षक विजयानंतरही जर्मनी संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ई गटातील स्पेन संघासाेबतचे गुण एकसारखे असल्यानंतरही जर्मनीला गाेलच्या अंतरातील पिछाडीने पॅकअप करावे लागले.

बातम्या आणखी आहेत...