आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Game Preparation Through Four Hours Of Practice; More Focus On Assimilation

दिव्य मराठी इंटरव्ह्यू- आर. प्रज्ञानंद:चार तासांच्या सरावातून गेमची तयारी; आत्मसात  चालीवर अधिक फाेकस

गौरव मारवाह | चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही गेमची तयारी करण्यासाठी मला चार तास पुरेसे आहेत. यापेक्षा अधिक वेगळे मी करत नाही. आत्मसात असलेल्या चालीवरच अधिक फाेकस ठेवतो. यातून मला खास डावपेच आखता येतात. यासाठी वेगळे डावपेच आखण्यावर मी कधीही भर देत नाही. माहीत असलेल्या चालीमुळे मला यशाचा पल्ला सहज गाठता येतो, अशा शब्दांत युवा चेस मास्टर आर. प्रज्ञानंदने दिव्य मराठीशी बाेलताना आपल्या यशाचे गुपित सांगितले. त्याने नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. त्याने चार महिन्यांत दुसऱ्यांदा कार्लसनला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. याबाबत त्याच्याशी साधलेला खास संवाद.

-तुला ऑनलाइन की ऑफलाइन गेम आवडतो?
मला ऑफलाइन गेम अधिक आवडतो. तसेच यादरम्यान पांढऱ्या सोंगट्यांवर खेळायला माझी पहिली पसंती असते. यावर खेळणेच माझ्यासाठी अधिक आवडीचे आहे. त्यावर मला आतापर्यंत मोठे यशही संपादन करता आले आहे.

-ब्लिट्झ व रॅपिडसाठी कोणते वेगळे डावपेच?
फक्त बुद्धिबळ खेळण्यावर माझा अधिक भर असतो. यातील सर्वोत्तम कामगिरीतून यश संपादन करण्यावर मी लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे यासाठी मी कधीही वेगळ्या प्रकारचे व खास असे डावपेच आखत नाही.

-चेस ऑलिम्पियाड किती फायदेशीर ठरणार?
चेस ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणे हीच सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक युवा बुद्धिबळपटूंना चालना मिळेल.

- स्पर्धेची तयारी कशी करतोस?
कोणत्याही स्पर्धेच्या तयारीवर मी कधीही फार मेहनत घेत नाही. फक्त एखाद्या गेमच्या तयारीसाठी मला चार तास पुरेसे असतात. यासाठी विशेष डावपेच आखण्यावर मी वेळही खर्च करत नाही. कारण आत्मसात चालीतून निश्चितपणे विजयाचा पल्ला गाठता येतो.

बातम्या आणखी आहेत...