आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय अध्यक्षपदासाठी निवडणूक:गांगुलीची माघार; राॅजर बिन्नींच्या नावाची चर्चा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा माजी कर्णधार साैरव गांगुलीने आता पुन्हा भारतीय क्रिकेट नियामक मंंडळाचे (बीसीसीआय) नेतृत्व करण्यास अनुत्सुकता दर्शवली. यासाठी त्याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी हाेणाऱ्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याला आता आयसीसीच्या नेतृत्वाचे वेध लागले आहे. ताे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. आता बीसीसीआयच्या नेतृत्वासाठी आता राॅजर बिन्नी यांच्या नावाची चर्चा रंगत आहे. १९८३ विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील सदस्य बिन्नी नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे.येत्या १८ ऑक्टाेबर राेजी बीसीसीआयची सर्वसाधारण सभा हाेणार आहे. याच बैठकीदरम्यान नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान ३८ पैकी ३५ राज्य संघटनांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. बिन्नी कर्नाटक संघटनेचे प्रतिनिधित्व करतील.

बातम्या आणखी आहेत...