आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्ल्यूटीए फायनल्स:गार्सिया डब्ल्यूटीए फायनल्स चॅम्पियन

फाेर्ट वर्थ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सची टेनिसपटू कॅराेलीन गार्सिया महिलांच्या प्रतिष्ठेच्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये चॅम्पियन ठरली. तिने महिला एकेरीचा किताब जिंकला. यासह तिने करिअरमध्ये पहिल्यांदाच याठिकाणी विजेती हाेण्याचा बहुमान मिळवला. यादरम्यान तिला १०.१५ काेटींचे बक्षीस आणि ट्राॅफी देऊन गाैरवण्यात आले. फ्रान्सच्या या २९ वर्षीय टेनिसपटूने महिला एकेरीच्या फायनलमध्ये सातव्या मानांकित आर्यंना सबालेंकावर मात केली. तिने १ तास ४१ मिनिटे शर्थीची झुंज देताना ७-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने यंदाच्या सत्रात सबालेंकावर सलग दुसरा आणि आेव्हरआॅल तिसरा विजय साजरा केला. तिच्या करिअरमधील हा ११ वा किताब ठरला. तसेच डब्ल्यूटीए फायनल्सचा किताब जिंकणारी कॅराेलीन गार्सिया ही फ्रान्सची दुसरी महिला टेनिसपटू ठरली. यापुर्वी २००५ मध्ये एमिलीने हे यश संपादन केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...