आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gayatri, Suraj, Chaitanya Selected For Maharashtra Team For National Tournament

राष्ट्रीय सबज्युनियर कॉर्फबॉल स्पर्धा:गायत्री, सूरज, चैतन्यची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे ३४ व्या वरिष्ठ गट व १८ व्या राष्ट्रीय सबज्युनियर कॉर्फबॉल स्पर्धेचे १ ते ४ सप्टेंबरदरम्यान महाराजा अग्रसेन विद्यापीठ, सोलन (हिमाचल प्रदेश) येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबादचे युवा खेळाडू गायत्री दगडिया व चैतन्य खरात यांची सबज्युनियर गटात आणि सूरज कदमची वरिष्ठ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. महाराष्ट्राचा संघ २९ ऑगस्ट रोजी हिमाचलला रवाना होईल. हे तिघे एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट््स असोसिएशनचे खेळाडू असून त्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

बातम्या आणखी आहेत...