आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gender Discrimination Ends On The Field; The Prize Money Is Now The Same In Most Sports, The Fastest Change In Cricket

दिव्य मराठी विशेष:मैदानावर महिला-पुरुष भेदभाव संपतोय; बहुतांश खेळांत बक्षिसाची रक्कम आता समान, क्रिकेटमध्ये हा बदल सर्वात वेगाने झाल्याचे चित्र

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभ्यासात दावा: जगात 48 पैकी 37 खेळांत पुरुष-महिला खेळाडूंची बक्षिसाची रक्कम समान

जगात जवळपास सर्व क्षेत्रांत महिलांना भेदभावाचा सामना करावा लागतो. पण क्रीडाविश्वात हा फरक कमी करण्याचा प्रयत्न झाला असून तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाला आहे. महिलांना बहुतांश खेळांत मिळणारी बक्षिसाची रक्कम आता पुरुषांएवढीच झाली आहे.

बीबीसीच्या अलीकडच्या अभ्यासातून असे दिसते की, ४८ पैकी ३७ खेळांत आता महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंएवढीच बक्षीस रक्कम मिळत आहे. म्हणजे बहुतांश खेळांत मोठ्या स्पर्धेत समान रक्कम दिली जात आहे. सर्वात मोठा बदल क्रिकेटमध्ये दिसत आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या ‘द १००’ स्पर्धेत पुरुष-महिलांसाठी समान बक्षीस रक्कम (१.५२ कोटी) ठेवण्यात आली आहे. बिग बॅश लीगमध्ये तर २०१७-१८ मध्येच हे झाले होते. २०२० च्या महिला वर्ल्ड कपमध्ये ७.२९ कोटी रुपये देण्यात आले, तेवढीच रक्कम पुरुषांना २०२१ ची स्पर्धा जिंकल्यावर मिळेल. अशाच प्रकारे २०२२ च्या महिला वर्ल्ड कपसाठी २५.५३ कोटींची रक्कम आहे. २०१७ मध्ये एकूण १४.५९ कोटी रुपयांपैकी इंग्लंडच्या महिला संघाने ४.८१ कोटी रुपये जिंकले होते. पुरुषांच्या संघाने २०१९ मध्ये एकूण ७२.९३ कोटींपैकी २९.१७ कोटी रुपये जिंकले होते.

या खेळांत भेदभाव कायम : २०१९ चा महिला फुटबॉल वर्ल्ड कप ११२ कोटी लोकांनी पाहिला, पण त्यात बक्षीस रक्कम पुरुषांच्या तुलनेत ९ पट कमी होती. २०१८ मध्ये फ्रान्सच्या पुरुषांच्या संघाला २७७ कोटी रु. तर अमेरिकेच्या महिला संघाला २९ कोटी मिळाले होते. गोल्फमध्ये गेल्या दोन मोठ्या विजेतेपद स्पर्धेत पुरुषांना १४.१९ कोटी तर महिलांना ४.६८ कोटी व ४.१९ कोटी रु. मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...