आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्रिडा:टी-20 मध्ये 4 चेंडूंत 4 बळी घेणारी जर्मनीची कर्णधार अनुराधा वैज्ञानिकदेखील आहे, अनुराधाने २०१४-१५ मध्ये एफसीसी महिला क्रिकेट क्लबची स्थापना केली

बर्लिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षणासाठी यूके, जर्मनीला गेली, क्रिकेटवरील प्रेम कायम

जर्मन महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुराधा डोड्डाबल्लापूर महिला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ४ चेंडूंत चार विकेट घेणारी पहिली खेळाडू बनली. १४ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रियाविरुद्ध सामन्यात १५ व्या षटकांत तिने ही कामगिरी केली. कर्नाटकसाठी खेळलेली अनुराधा कार्डियोवस्कुलर वैज्ञानिक आहे. तिने म्हटले की - विज्ञान व क्रिकेटमध्ये संतुलन राखणे खूप कठीण आहे, मात्र तिला एक कायम ठेवण्यासाठी सोडावे लागले नाही. मध्यम गती वेगवान गोलंदाज अनुराधाने त्या षटकात फिरकी गोलंदाजी केली होती. मूळ बंगळुरू येथील बासावानागुडीच्या अनुराधाच्या वडिलांना कसोटी क्रिकेट खूप आवडत हाेते. अनुराधाला सचिन तेंडुलरकरची फलंदाजी व अॅलन डोनाल्डच्या गोलंदाजी शैलीची चाहती आहे. १२ व्या वर्षी कर्नाटक महिला खेळाडूंतर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिरात प्रवेश घेतला. हे शिबिर माजी कर्णधार शांता रंगास्वामी व वेंकटचर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यानंतर राज्याच्या १६ व १९ वर्षांखालील संघाची ती सदस्य बनली. दक्षिण विभाग व कर्नाटकच्या वरिष्ठ संघाकडून खेळली. तिने वेदा कृष्णमूर्ती वनिता व्हीआर, ममता माबेन व करुणा जैनसारख्या भारताच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले आहे.

पुरुष संघाकडून खेळली क्रिकेट
अनुराधाने २००८ मध्ये न्यूकॅसल विद्यापीठाकडून मेडिकल जेनेटिक्समध्ये पुढील शिक्षणासाठी यूकेला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, येथे गेल्यानंतरही क्रिकेटवरील प्रेम कमी झाले नाही. अनुराधाने म्हटले की, ‘मी न्यूकॅसलच्या एका क्लबकडून खेळणे सुरू केले. काही काउंटी प्रशिक्षकांनी माझी दखल घेतली. मी नॉर्थम्बरलँड महिला काउंटीकडून काही सत्र खेळले.’ त्यानंतर कार्डियोवस्कुलर बायोलॉजीमध्ये पीएचडी करण्यासाठी २०११ मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्ट गाठले. शहरातील एकमेव फ्रँकफर्ट क्रिकेट क्लबकडून २०१३ व २०१४ सत्रात अनुराधाने पुरुष संघाकडून क्रिकेट खेळले. त्यानंतर देशात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा निर्णय झाला. ती म्हणते, ‘देशातील खेळ वाढवण्यासाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे व प्रयत्न करायला हवे असे मला वाटले.’ २०१३ मध्ये टी-२० युरोपियन स्पर्धेत तिला जर्मनीकडून खेळण्याची संधी मिळली. २०१४-१५ मध्ये तिने एफसीसी महिला क्रिकेट क्लबची सुरू केला. २०१७ मध्ये तिला जर्मनी संघाचे नेतृत्व मिळाले.

जर्मनीमध्ये ८० टक्के हुशार किंवा पूर्णवेळ नोकरी करणारे
जर्मन महिला क्रिकेट संघातील ८० टक्के खेळाडू हुशार किंवा पूर्णवेळ नोकरी करणारे आहेत. जर्मनीसाठी पहिली हॅट््ट्रिक घेणारी ऐनी बिरविस्क टॉक्सिकोलॉजीमध्ये पीएचडी आहे. पॅरिस वडेनपोहल ६ वर्षीय मुलाची आई आहे. त्याबरोबर ती बालवाडीची शिक्षिका आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी तिने दोन वर्षांची विश्रांती घेतली होती. अनुराधाचे कौतुक करताना बिएर्विस्चने म्हटले की, ‘आमची कर्णधार अनुभवी आहे. क्रिकेटसोबत जीवनातील मुद्द्यांवर चांगला सल्ला देते.’