आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीचा गेम ओव्हर:16 मिनिटांमध्ये 3 गाेल केल्यानंतरही जर्मनीचे आव्हान संपुष्टात

अल खाेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर्मनीची काेस्टारिका संघावर ४-२ ने मात

चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनी संघाचा फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील गेम ओव्हर झाला आहे. जर्मनी संघाने गटातील सामन्यात काेस्टारिकावर ४-२ अशा फरकाने मात केली. गनब्री (१० वा मि.), हार्वेटझ (७३, ८५ वा मि.) आणि फुलक्रुग (८९ वा मि.) यांनी सरस खेळीतून जर्मनीला माेठा विजय मिळवून दिला. काेस्टारिका संघाकडून तेेगेदाने (५८ वा मि.) एकमेव गाेल केला. मात्र, जर्मनीच्या नेऊरने काेस्टारिकाच्या नावे दुसऱ्या गाेलची नाेंद केली. त्याने ७० व्या मिनिटाला आत्मघाती गाेल केला. मात्र, राेमहर्षक विजयानंतरही जर्मनी संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ई गटातील स्पेन संघासाेबतचे गुण एकसारखे असल्यानंतरही जर्मनीला गाेलच्या अंतरातील पिछाडीने पॅकअप करावे लागले. दुसरीकडे जपान संघाने रंगतदार लढतीत स्पेनवर मात केली. मात्र, या सामन्यातील पराभवानंतरही स्पेन टीमला यंदाच्या विश्वचषकाची बाद फेरी गाठता आली. विश्वचषकाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चार वेळच्या उपविजेत्या जर्मनी संघाला सलग दुसऱ्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरली. यापूर्वी २०१८ मधील विश्वचषकातही जर्मनी संघाला बाद फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले हाेते. विजयासह जपान आणि पराभवासह स्पेन टीमने याच गटातून बाद फेरीचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्यामुळेे आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियमपाठाेपाठ बलाढ्य जर्मनीचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जर्मनीचेे सामन्यात ६९ टक्के चेंडूवर पझेशन हाेते.

गाेलरक्षक मॅन्युअलने केला १९ सामन्यांचा विक्रम जर्मनी संघाच्या कर्णधार मॅन्युअल नाॅयरच्या नावे विश्वचषकात सर्वाधिक सामन्यांच्या विक्रमाची नाेंेद झाली. ताे सर्वाधिक १९ वेळा विश्वचषकाच्या सामन्यात सहभागी झाला. यासह त्याने ब्राझीलच्या क्लाऊडियाेच्या १८ सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकले. मॅन्युअल हा २०१४ मधील विजेत्या जर्मनी संघाचाही सदस्य खेळाडू हाेता. याच विश्वचषकात ताे गाेल्डन ग्लवचा मानकरी ठरला हाेता.

बातम्या आणखी आहेत...