आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Give A Post To 'Maharashtra Kesari', Don't Just Run Away With Medals To The Winning Wrestlers: Ramraje Nimbalkar

कुस्ती:‘महाराष्ट्र केसरी’ला एखादं पद द्यावं, विजेत्या कुस्तीगीरांना फक्त पदक देऊन भागणार नाही : रामराजे निंबाळकर

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या कुस्तीगीरांना फक्त पदक देऊन भागणार नाही. त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढील पिढीला होण्यासाठी त्यांना एखादं पद द्यावं,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. पहिल्या दिवशी वजनी गटातील साखळी सामने सुरू झाले. तत्पूर्वी पंचांचे प्रशिक्षण शिबिर पाडले. येथील छत्रपती शाहू स्टेडियमच्या संकुलामध्ये ६४ व्या वरिष्ठ राज्य व महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, दीपक पवार, सुधीर पवार आदींची उपस्थिती होती.

यंदाची गदा १२ किलो चांदीची

महाराष्ट्र केसरी विजेत्याला १९८३ पासून मोहोळ कुटुंबीयांतर्फे गदा देण्यात येते. यंदाची १२ किलोची गदा असून ३२ गेज जाड शुद्ध चांदीचा पत्रा लावून कोरीव कामांची झळाळी देण्यात आली आहे. गदेच्या मध्यभागी स्व. मामासाहेब मोहोळ यांची प्रतिमा आहे. गेल्या ३८ वर्षांपासून पेशवेकालीन कारागीर पानघंटी ही गदा बनवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...