आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतरमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या जपान आणि सौदी अरेबियासारख्या देशांनी अर्जेंटिना आणि जर्मनीला पराभूत करून सर्वांना धक्का दिला आहे. आशियाला फुटबॉलबाबत कमी उत्साहाचा महाद्वीप समजले जात आहे. मात्र, आता या खेळाबाबत कल बदलत आहे. भारतालाही फुटबॉल खेळणारा देश समजले जात नाही, कारण येथे प्रामुख्याने क्रिकेटचा दबदबा आहे. मात्र गेल्या काही काळापासून खुद्द फिफाद्वारे भारतात फुटबॉलबाबत चालवल्या जात असलेल्या मोहिमेमुळे सकारात्मक वातावरण तयार होत आहे. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन फुटबॉलला तरुणांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी फिफाचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे येथील तरुणांना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळेल आणि फुटबॉलचा प्रचार करून फिफाला कोट्यवधी प्रेक्षकही मिळतील. यानुसारच भारतात फुटबॉलचे उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यासाठी फिफा कोचना प्रशिक्षण देत आहे. यासाठी आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या माध्यमातून विविध कोर्स चालवले जात आहेत. याशिवाय भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने आयोजित केले जातील अशा स्टेडियमची उभारणी करण्यासाठी फिफा सहकार्य करत आहे. असेच एक प्रशिक्षण केंद्र भुवनेश्वरमध्ये विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवू पाहणाऱ्यांसाठी संधींची मजबूत पायाभरणी होत आहे.
इंडियन सुपर लीगपासून ते विमेन्स लीग अशा स्पर्धेच्या अनेक संधी भारतात फुटबॉलचा ज्वर कसा वाढत आहे, हे या खेळाच्या वाढत्या स्पर्धांवरून लक्षात येईल. भारतात इंडियन सुपर लीग, आय लीग, आय लीग सेकंड डिव्हिजन, स्टेट लीग्स, एलीट लीग्स, इंडियन विमेन्स लीग आदी स्पर्धा अत्यंत लोकप्रिय होत आहेत. यातून पुढे येणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. याशिवाय सुपर कप आणि ड्यूरंड कपसारख्या पारंपरिक स्पर्धाही वेगाने लोकप्रिय होत आहेत. महिलांच्या फुटबॉललाही मोठी पसंती मिळत आहे. या स्पर्धांनी या खेळात कारकीर्द करू पाहणाऱ्यांसाठी संधी वाढवल्या आहेत.
या खेळामुळे देशाला मिळतील उत्कृष्ट खेळाडू देशातील फुटबॉल खेळाडूंच्या नव्या पिढीने सर्व जगाला प्रभावित केले आहे. यामध्ये अमरजित सिंह कियाम, जॅक्सन सिंह, धीरज सिंह मोईरंगथम, मोहम्मद नवाज, सुमित राठीसारख्या नावांची मोठी यादी आहे. अमरजित सिंहचे वडील एक सामान्य शेतकी आहेत. त्याच्या आई थौबल येथून इंफाळला जाण्यासाठी पहाटे ३.३० वाजता घरातून निघायच्या आणि तेथे घरोघरी जाऊन मासे विकायच्या. अमरजितने आपल्या कौशल्याच्या बळावर भारताच्या अंडर 17 टीमचे कर्णधारपद मिळवले आहे.
या खेळात कारकिर्दीची सुरुवात कशी करू शकता? मुलांमध्ये फुटबॉलची कौशल्ये विकसित करण्यासाठी आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन ग्रासरूट्स फुटबॉलसारखे उपक्रम राबवत आहे. यात ६ ते १२ वर्षांच्या मुला-मुलींना खेळण्याची संधी दिली जाते. कौशल्ये विकसित करण्यासाठी फेडरेशनकडून भारतात प्रशिक्षित फुटबॉल कोचची नियुक्ती केली जाते. व्यावसायिक फुटबॉल खेळण्याची इच्छा असलेले तरुण फेडरेशनच्या माध्यमातून अकादमीत प्रवेश घेऊ शकतात. फेडरेशनच्या जवळपास ८३ फुटबॉल अकादमी अधिकृत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.