आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:भूमिका, कौस्तुभ, ओजल, राजवर्धनला सुवर्ण

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटना व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भूमिका वाघले, कौस्तुभ वाघ, आर्यन सोनवणे, राजवर्धन झंवर, ओजल शेवतेकर आणि सुदीप पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत एकूण ७७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

ओम तांबटकर आणि चैतन्य कळकाटे या दोन दिव्यांग आणि अंध खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधले. त्याच्या कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. विजेत्या खेळाडूंना जिल्हा संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, अजय पटेल, संचालक सुनील सुतावणे, प्रशिक्षक विलास राजपूत, रमाकांत रौतल्ले व मिथुन वाघमारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे बाल खेळाडू - अधिरा शेवतेकर, अन्वेशा खाकसे, शिवांश थोरे. ८ वर्षे गट - भूमिका वाघले, अयाण चक्रबर्ती, गवळी भक्ती, देवांश तोतला, स्वरा लड्डा. १० वर्षे - कौस्तुभ वाघ, सुमेध मोराळकर, सोहम गडगिले, आर्यन कुलकर्णी, सक्षम जैन. १२ वर्षे - आर्यन सोनवणे, तनय कवाडे, साई बहुरे, रणवीर बहुरे, प्रथमेश बडक. १४ वर्षे - राजवर्धन झंवर, पूर्वा देशपांडे, संस्कृती मोराळक, सानिका माळी, कारुण्या वागले. १६ वर्षे - ओजल शेवतेकर. खुला गट - सुदीप पाटील, श्रीराम पाटील, निखिल चौथमल, बाळासाहेब म्हस्के, मधुर तामणे.

बातम्या आणखी आहेत...