आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय सलामीवीर शुभमन गिलने (१२८) शतक झळकावत मनभर विक्रम आपल्या नावे केले. या वर्षी तिन्ही प्रकारात शतक करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याचबरोबर २०२३ मध्ये सर्वाधिक धावा, शतके, ५०+ धावा, चौकार, षटकार, सर्वोत्कृष्ट सरासरी सर्व गोष्टी शुभमनच्या नावे आहेत. शुभमनने या वर्षी ५ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली. त्याने वनडेत दुहेरी शतकही ठोकले. दरम्यान, त्याचे शतक व कोहलीच्या (५९*) जोरावर भारताने चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ३ बाद २८९ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर संपुष्टात आला.
पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ हजार धावा करणारा चौथा फलंदाज भारताने दुसऱ्या दिवशीच्या बिनबाद ३६ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार रोहित व शुभमनने सुरुवात केली. रोहित (३५) संघाच्या ७४ धावा असताना बाद झाला. त्याने कसोटीत सर्वात वेगवान २००० धावा करण्याचा भारतीय खेळाडू म्हणून सचिनचा विक्रम मोडला. रोहितने ३६ डावात हे यश मिळवले, तर सचिनने ३८ धावा अशी कामगिरी केली होती. त्यानंतर शुभमनने पुजारा (४२) सोबत दुसऱ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली. पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००० कसोटी धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज बनला.
यापूर्वी, सचिन, लक्ष्मण, द्रविड यांनी अशी कामगिरी केली आहे. पुजाराने नाथन लियोनविरुद्ध ५३०+ धावा काढल्या. जो एकाच गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम आहे. शुभमनने २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचत १२८ धावा काढल्या. शुभमन एक वर्षात तिन्ही प्रकारात शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी, सुरेश रैना २०१०, केएल राहुल २०१६ व रोहित शर्माने २०१७ मध्ये अशी कामगिरी केली आहे. तो एका वर्षात सर्व प्रकारात शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर आहे. लियोन, कुहनेमन आणि मर्फीने प्रत्येकी एक एक गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.