आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Chahal Made A Milk Gourd Bat, Inspired By Panchayat Series, Yuvraj Singh Said This Is Your Size

चहलने दुधीभोपळ्यालाच बनवली बॅट:पंचायत मालिकेपासून झाला प्रेरित, युवराज सिंग म्हणाला- हा तर आहे तूझ्याच आकाराचा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने शनिवारी सोशल मीडियावर दुधीभोपळा हातात घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी पैज लावतो की माझ्या दुधीभोपळ्याने लगावलेला शॉट हा नक्कीच स्टेडियमच्या आरपार गेला असावा, जितेंद्र तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? खरं तर पंचायत वेब सीरिजमध्ये सरपंच जी आणि अभिनेता जितेंद्र म्हणजेच सचिव यांना दुधीभोपळ्याची भेट देत असतो. त्यावरुनच चहल तोच दुधीभोपळा इथे सोशल मीडियावर शेअर करत आहे. आजकाल लोकांना ही मालिका खूप आवडत आहे

युवराज सिंगने केली मजेशीर कमेंट

भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने चहलच्या दुधीभोपळ्याच्या पोस्टवर मजेशीर कमेंट केली आहे. त्याने लिहीले की, दुधीभोपळ्याचा आकार तुझ्या इतकाच मोठा असल्याचे दिसते. युवराज आणि चहल खूप चांगले मित्र आहेत आणि दररोज दोघे सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करत असतात.

चाहत्यांनीही चहलच्या हेअरकटचा लुटला आनंद

चहलने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट अलीम हकीमकडून हेअरकट करून घेतले. हा फोटो समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर मजेशीर कमेंट्स केल्या. अलीम हकीमने चहलचा फोटो शेअर केला आणि लिहिले की आपल्या युझवेंद्र चहलसाठी, फ्रेश हेअर समर कट, यावर त्याच्या एका चाहत्याने लिहिले की असे केस कापण्याचा काय उपयोग कारण आंघोळ केल्यावर ते पूर्वीसारखे होईल. तर काहींनी कमेंटमध्ये लिहिले की, 50 रुपयांमध्ये गावात यापेक्षा चांगली कटिंग केली जाते.

चहलची IPL मधील कामगिरी

चहलने या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून 17 सामने खेळले असून 27 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. या हंगामात तो पर्पल कॅपचा खेळाडूही होता. आता चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग असेल. या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याची कुलदीप यादवसोबतची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...