आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gujarat Giants Team Wins; Mumbai Indians' Challenge Today Against Delhi Team's Uvla Khurda UP Warriors

गुजरात जायंट्स संघ विजयी; दिल्ली संघाचा उडवला खुर्दा:यूपी वाॅरियर्जसमाेर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर अॅश्ले गार्डनरने (नाबाद ५१, २ बळी) अष्टपैलू खेळीच्या बळावर आपल्या गुजरात जायंट्स संघाला गुरुवारी महिला प्रीमियर लीगमध्ये राेमहर्षक विजय मिळवून दिला. गुजरात संघाने लीगमधील आपल्या सहाव्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा ११ धावांनी पराभव केला. यासह गुजरात संघाला दुसरा विजय साजरा करता आला. यासह या टीमने दिल्लीच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात दिल्ली संघासमाेर विजयासाठी १४८ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात दिल्ली संघाचा १८.४ षटकांत अवघ्या १३६ धावांवर खुर्दा उडाला. संघाकडून मारीझनेने सर्वाधिक ३६ व अरुधंती रेड्डीने २५ धावांची खेळी केली. संघाची कर्णधार मेग लॅनिंगने १८ आणि अलिसे कॅप्सीने २२ धावा काढल्या. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता आला नाही. गुजरात संघाकडून सामनावीर अॅश्ले गार्डनरसह तनुजा कन्वर आणि किम गार्थने प्रत्येकी २, कर्णधार स्नेह राणाने १ विकेट घेतली.

मुंबईला विजयी षटकाराची संधी : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेला मुंबई इंडियन्स संघ महिला प्रीमियर लीगमध्ये सलग सहाव्या विजयासाठी सज्ज झाला आहे. मुंबईला लीगमध्ये विजयी षटकाराची संधी आहे. मुुंबई व यूपी वाॅरियर्ज यांंच्यात आज शुक्रवारी सामना रंगणार आहे. मुंबई संघाने आतापर्यंत लीगमध्ये सलग पाच सामन्यांत विजयाची नाेंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...