आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर साेफिया डंकले (६५) आणि हरलीन देओलसह (६७) गाेलदंाज अॅश्ले गार्डनर (३/३१), अनुबेल (२/५६) यांनी सर्वाेत्तम खेळीतून गुजरात जायंट्स संघाचे पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. सलगच्या दाेन पराभवांनंंतर स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली गुजरात महिला संघाने बुधवारी स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात विजय साजरा केला. गुजरात संघाने सामन्यात स्मृती मानधनाच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा ११ धावांनी पराभव केला. यातून गुजरातने पहिला विजय नाेंदवला. दुसरीकडे बंगळुरू संघाला स्पर्धेत सलग तिसऱ्या लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २०१ धावा काढता आल्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १९० धावांपर्यंत मजल मारता आली. संघाच्या विजयासाठी साेफिई डेव्हिनने एकाकी झंुज देताना ६६ धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांच्या सुमार खेळीने टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
साेफियाचे पहिले अर्धशतक; स्मृती तिसऱ्या सामन्यात फ्लाॅप सामनावीर साेफियाने आता तिसऱ्या सामन्यातून यंदाच्या महिला लीगमध्ये अर्धशतकाचे खाते उघडले. यासह तिने संघाला विजय मिळवून दिला. तिने हरलीन आणि गार्डनरसाेबत प्रत्येकी एक अर्धशतकी भागीदारी रचली. तिने २८ चेंडूंमध्ये ९ चाैकार व १ षटकारासह ६५ धावा काढल्या. बंगळुरू संघाने विक्रमी काेट्यवधी रुपयांची बाेली लावलेली कर्णधार स्मृती सलग तिसऱ्या सामन्यांतही फ्लाॅप ठरली. तिने आतापर्यंत तीन सामन्यांदरम्यान ३५, २३ व १८ अशी एकूण ७६ धावांची नाेंद केली. मात्र, तिला सुमार फलंदाज व नेतृत्वाने टीमची पराभवाची मालिका राेखता आली नाही.
विजयी हॅट्ट्रिकसाठी मुंबई-दिल्लीत चुरस सलगचे दाेन सामने जिंकून फाॅर्मात असलेल्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आता महिला प्रीमियर लीगमध्ये पहिल्या विजयी हॅट्ट्रिकसाठी चुरस रंगणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आणि मेन लॅनिंगच्या नेतृृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघ आज गुरुवारी समाेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांच्या नावे सलग दाेन विजयांची नाेंद आहे. यामुळे आता हे दाेन्ही संघ सरस खेळीतून परस्परांच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावण्यासाठी उत्सुक आहेत. यातून या दाेन्ही संघांमधील ही विजयी हॅॅट्ट्रिकसाठीची चुरस अधिकच रंगतदार हाेण्याची शक्यता आहे. विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार मेन लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने स्पर्धेत सलग दाेन सामने जिंकले आहेत. संघाने यादरम्यान एलिसाच्या नेतृत्वातील यूपी वाॅरियर्ज आणि स्मृतीच्या नेतृत्वातील राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमविरुद्ध एकतर्फी विजय साजरे केले आहेत. तिसऱ्या विजयासह हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी मुंबई संघाने कंबर कसली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.