आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करारातून बाद:गुप्टिल मुख्य करारातून बाद, यापूर्वी बोल्ट-ग्रँडहोमही बाहेर

वेलिंग्टन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्टिन गुप्टिलला न्यूझीलंडने मुख्य करारात स्थान दिले नाही. या निर्णयानंतर गुप्टिलने एक पत्र लिहीत म्हटले की, “देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. मला न्यूझीलंडकडून खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी न्यूझीलंड मंडळाचा आभारी आहे.’ तो म्हणाला की, मी अजूनही निवडीसाठी उपलब्ध असेल. तो न्यूझीलंडचा तिसरा अनुभवी खेळाडू आहे, ज्याला मुख्य करारातून वगळण्यात आले. यापूर्वी ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनाही वगळले आहे. २०१५ विश्वचषक अंतिम आणि २०१९ विश्वचषक खेळलेल्या न्यूझीलंड संघाचा गुप्टिल सदस्य होता. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तो न्यूझीलंड संघाचा सदस्यदेखील होता. पण एकाही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. त्यांच्या जागी फिन -लनला पसंती देण्यात आली. भारताविरुद्धच्या निवडलेल्या टी-२० संघातही तो नव्हता.

बातम्या आणखी आहेत...