आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Haaland, Lewandowski To Play Against Old Club In League, Ukrainian Club Shakhtar Donetsk To Play In Poland

चॅम्पियन्स लीग:हॅलेंड, लेवांडोस्की साखळीत जुन्या क्लबविरुद्ध खेळणार, युक्रेनचा क्लब शाख्तर डोनेस्तक पोलंडमध्येच सामने खेळणार

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ती वेळ परत आली आहे जेव्हा युरोपमधील फुटबॉल स्टेडियममध्ये “द चॅम्पियन्स” हे गाणे पुन्हा ऐकू येईल. चॅम्पियन्स लीग मंगळवारपासून गट टप्प्यातील सामन्यांसह सुरु हाेईल. २ नोव्हेंबरपर्यंत साखळीत ३२ संघ असतील. या वेळी जर्मनीकडून माेठे बदल झालेत. बायर्न म्युनिकचा लेवांडोव्स्की बार्सिलोनामध्ये सामील झाला तर बोरुसियाच्या हॅलेंडला मँचेस्टर सिटीने विकत घेतले. दोन्ही खेळाडूंचे जुने आणि नवे संघ एकाच गटात आहेत, म्हणजे लेवांडोव्स्की आणि हॅलँड परत जुन्या संघांविरुद्ध लढतील.

रिअल, सिटी आणि लिव्हरपूल बाद फेरी गाठण्याची ९०% शक्यता डेटा स्पेशालिस्ट नेल्सन ग्रेसनोट यांच्या मते, रियल चॅम्पियनपदाचा मोठा दावेदार आहे. त्याला पुढील वर्षी मे महिन्यात ट्रॉफी जिंकण्याची २१% शक्यता आहे. मँचेस्टर सिटी, रियल माद्रिद, लिव्हरपूल यांना बाद फेरीत स्थान मिळण्याची ९० % शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...