आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅार्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन:हॅमिल्टन एकटा करताे 1090 काेटींची कमाई; आयपीएलच्या आठ संघांची कमाई 500 काेटी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वात अव्वल फुटबाॅल क्लब मंँचेस्टर युनायटेडचे वार्षिक उत्पन्न हॅमिल्टनपेक्षा 240 काेटींनी अधिक

क्रीडा विश्वात सध्या प्राेफेशनल स्पाेर्ट््समध्ये अॅम्येचाेरमधून सर्वाधिक कमाई केली जाते. यामध्ये सर्वाधिक पैसा मिळत असल्याचे क्रीडा तज्ञांचे मत आहे. यशिवाय खेळाडूंनीही यामध्ये काेट्यवधींची स्पाॅन्सरशिप मिळवून याची प्रचिती आणून दिली. यामध्ये खास करून किट आणि जर्सीच्या स्पाॅन्सरशिपमधून सर्वाधिक कमाई केली जात आहे.

सहा वेळचा एफ-वन वर्ल्ड चॅम्पियन लुईस हॅमिल्टनची वर्षभरातील एकट्याची कमाई ही १०९० काेटींची आहे. दुसरीकडे आयपीएलमधील आठ संघांच्या कमाईचा आकडा हा ५०० काेटींचा आहे. कमाईत हॅमिल्टन आघाडीवर आहे.याशिवाय फुटबाॅल क्लब मंॅचेस्टरही अव्वल आहे.

फॉम्युर्ला-1 - हॅमिल्टनचा १२ कंपन्यांसाेबत करार
सहा वेळचा फाॅर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन लुईस हॅमिल्टनने जाहिरातीसाठी जवळपास १२ कंपन्यांसाेबत करार केला. त्याच्या किटवर या सर्व कंपन्यांचे लाेगाे आहेत. यामध्ये क्लाेडिंग ब्राॅडपासून एनर्जी ड्रिंक्सचा समावेश आहे. तसेच इंग्लंडचा रेसर व जर्मन आॅटोमोटिव्ह कंपनी मर्सिडीज १०९० काेटींची कमाई करतात.
- एफ-1 ला गत १५ वर्षांत प्रायाेजकत्वातून जवळपास २ लाख २५ हजार काेटी मिळाले. १०६६ कंपन्यांसाेबत सहा हजार करार झाले.
- मर्सिडीजने पेट्रोनेससाेबत ५६२ काेटींची टायटल स्पॉन्सरशिप केली. फेरारीच्या फिलिप माॅरिससाेबतची १३२२ काेटींची स्पाॅन्सरशिप सर्वाधकि महागडी मानली जाते.

हॅमिल्टनचे प्रायाेजक व मिळणारे उत्पन्न
मर्सडीज बेंज - 292 काेटी
पेट्रोनेस - 486 काेटी
प्यूमा - 19 काेटी
मॉन्स्टर एनर्जी - 15 काेटी
बोस - 24 काेटी
टॉमी हिलफिगर - 39 काेटी
यूबीएस - 68 काेटी
क्राउडस्ट्राइक - 73 काेटी
एप्सन - 34 काेटी
आयडब्ल्यूसी शेफहाउजन - 16 काेटी
विल्हरी -16 काेटी
टिबको - 10 काेटी

फुटबाॅल: जर्सीतून १३३० काेटी यूनायटेडला मिळतात
इंग्लिश क्लब मँचेस्टर युनाटटेड किट आणि जर्सी स्पॉन्सर्सच्या माध्यमातून जवळपास १३३० काेटींची कमाई करते. आदिदास दरवर्षी ७३० काेटी रुपये क्लबला देते. जर्सी स्पाॅन्सर शेवरलेकडून क्लबला ६०० काेटी मिळतात.
- टॉप-10 क्लबने यंदा २८ काेटींची कमाई केली. ही एकूण स्पाॅन्सरशिपच्या तीनपट मानली जाते.
- फुटबॉल क्लबला सर्वाधिक किट सप्लाय करण्यात आदिदास पहिल्या आणि नाइकी दुसऱ्या स्थानावर आहे. आदिदासचे सरासरी व्हॅल्यू ४२८५ काेटी व नाइकीचे २७१४ काेटी असल्याचे दिसते.

क्रिकेट: मुंबई इंडियन्सला १०० काेटींची आशा
आयपीएल फ्रँचायझीला यंदाच्या सत्रात ५०० काेटींच्या कमाईची माेठी आशा आहे. यामध्ये लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सला यंदा १०० काेटींची आशा आहे. स्पाॅन्सरशिपने हे उत्पन्न मिळेल. परफाॅरमॅक्स कंपनीने किट व सॅमसंग माेठा स्पाॅन्सर आहे.
- चेन्नई ९५ काेंटीसह सर्वाधिक कमाईमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
- जियो आठ संघांसाठी प्रायाेजक आहे. यासाठी १५० काेटींची डील केलेली आहे. किंगफिशर किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, हैदराबाद व आरसीबीचा स्पाॅन्सर आहे.

बास्केटबॉल: गोल्डन स्टेटचे ४५० काेटींचे उत्पन्न
अमेरिकन बास्केटबॉल लीग एनबीएचा संघ गाेल्डन स्टेट वाॅरियर्स दरवर्षी जवळपास ४५० काेटींची कमाई करते. यासाठी या संघाने जर्सी स्पाॅन्सर कंपनी रेकुटेनसाेबतच हा माेठा करार केला आहे. त्यामुळे एनबीएमध्ये जर्सी स्पाॅन्सरशिपमधील ही सर्वात माेठी डील मानली जाते. न्यूयाॅर्क निक्सचे प्रायाेजक स्क्वेअरस्पेस आहे. टीमने यासाठी ३१५ काेटींचा करार केला आहे.
- जर्सी स्पॉन्सरशिपची सुरुवात २०१७-१८ च्या सत्रात झाली. यापूर्वी खेळाडूंच्या जर्सीवर फक्त कंपनीचा लाेगाे असायचा.

बातम्या आणखी आहेत...