आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूची १७ वर्षीय बॅडमिंटनपटू मनीषा रामदास रविवारी टाेकियाे येथे वर्ल्ड चॅम्पियन ठरली. तिने पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचा किताब जिंकला. ती महिला एकेरीच्या एसयू-५ मध्ये किताब विजेती ठरली. तिने फायनलमध्ये जपानच्या मामिकाे टाेयाेडाचा पराभव केला. यासह तिला हा किताब आपल्या नावे करता आला. भारतीय संघाने या स्पर्धेत विक्रमी १६ पदकांची कमाई केली. यादरम्यान पॅरा ऑलिम्पियन चॅम्पियन प्रमाेद भगतही सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. तामिळनाडूच्या या गुणवंत बॅडमिंटनपटूला डाॅक्टरांच्या चुकीच्या उपचाराने अधुपण आले. चुकीचे आैषधी दिले गेल्याने तिला आपला हात गमवावा लागला. यादरम्यान तिच्यावर तीन माेठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात तिला रुग्णालयात जावे लागले. तिच्यावर वयाच्या १२ व्या वर्षी माेठ्या शस्त्रक्रिया झाल्या. मात्र, यातून तिने अनेक गाेष्टी आत्मसात केल्या. आलेल्या अधुपणावरही मात करण्याचा निर्धार तिने केला. यातून तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तिने मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर या सर्व अडचणींना दूर केले. यातून तिला बॅडमिंटनमध्ये आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावता आला. त्यामुळे तिने २०१९ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत पदार्पण केले. यामध्ये साेनेरी यश संपादन करत तिने राष्ट्रीय स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला. मात्र, त्यानंतर तिला काेेराेना महामारीचा फटका बसला. लाॅकडाऊनमुळे तिला काही स्पर्धांमध्ये सहभागी हाेता आले नाही. मात्र, तिने आपला सराव कायम ठेवला. यातून तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाेता आले आहे. आता तिने टाेकियाेतील जागतिक स्पर्धा गाजवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.