आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई क्रीडा स्पर्धा:हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धा कोरोनामुळे स्थगित

ताश्कंद/बीजिंग19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे या वर्षी सप्टेंबरमध्ये हांगझोऊमध्ये होणारी १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात aआली आहे. नव्या तारखांची घोषणा लवकरच केली जाईल. चीनच्या सरकारी माध्यमांनुसार ताश्कंदमध्ये शुक्रवारी झालेल्या ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या (ओसीए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑलिम्पिकनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेला दुसरी सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. नियोजित कार्यक्रमानुसार या खेळांचे आयोजन शांघायपासून १७५ किलोमीटरवरील झेंजियांग प्रांताची राजधानी हांगझोऊमध्ये १० ते २५ सप्टेंबरदरम्यान केले जाणार होते.

बातम्या आणखी आहेत...