आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Hardik 2nd Indian Captain To Win 4 Consecutive Opening Matches; Deepak Hooda's 4 Wickets

दुसरा टी-20:हार्दिक सुरुवातीचे सलग 4 सामने जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार; दीपक हुड्डाचे 4 बळी

औरंगाबाद / माउंट मॉनगानुई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने दुसऱ्या टी-२० मध्ये न्यूझीलंडला ६५ धावांनी हरवले. संघाचा तीन टी-२० सामन्याच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना २२ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना भारताने ९.५५ च्या स्ट्राइक रेटने ६ बाद १९१ धावा उभारल्या. संघाने न्यूझीलंडविरुद्ध चौथी सर्वोच्च धावसंख्या उभारली. हार्दिकच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरला होता. त्याने आतापर्यंत चार टी-२० सामन्यांत नेतृत्व केले आणि सर्व सामन्यांत विजय मिळवला. तो अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला.

यापूर्वी रोहित शर्माने अशी कामगिरी केली आहे. पंत (६) पुन्हा एकदा अपयशी ठरला. ईशान किशनने ३६ धावा काढल्या. सूर्यकुमारने २१७.६४ च्या स्ट्राइक रेटने ५१ चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांसह नाबाद १११ धावा ठाेकल्या. हे त्याचे टी-२० मधील दुसरे शतक ठरले. टीम साउदीने ३ गडी बाद केले. प्रत्युुत्तरात न्यूझीलंडचा डाव १८.५ षटकांत १२६ धावांत ढेपाळला. संघाचे २ खेळाडू २० धावांचा आकडा गाठू शकले. विल्यम्सनने (६१) अर्धशतक केले. कॉन्वेने २५ धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...