आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयने दिले खांदेपालटाचे संकेत:हार्दिककडे नेतृत्वाची धुरा, राेहितला विश्रांती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंड संघाविरुद्ध पराभव झाला. हाच पराभव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वर्मी लागला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने तत्काळ आक्रमक पवित्रा घेत थेट संघासह नेतृत्वातही ख‌ांदेपालट करण्याचे संकेत दिले. यातून नियमित कर्णधार राेहित शर्माला लवकरच नारळ मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी संघाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिक पंड्याकडे साेपवली जाण्याची चर्चा आहे. बीसीसीआयने सध्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा माेठा धसका घेतला आहे. यातूनच संघामध्ये नव्याने माेठा बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. आता राेहितला आगामी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेदरम्यान विश्रांती देण्यात आली. काेहलीही या मालिकेदरम्यान सहभागी हाेणार नाही. त्यालाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. .

हार्दिकची रंगीत तालीम हार्दिक पंड्याने सर्वाेत्तम खेळीबराेबरच आपल्यातील कुशल नेतृत्वाची क्षमताही सिद्ध केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये गुजरात संघाला पदार्पणातच चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळेच हार्दिककडे न्यूझीलंड दाैैऱ्यासाठी टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० मालिका खेळणार आहे. यातूनच त्याच्यासाठी ही मालिका म्हणजेच रंगीत तालीमच आहे.

बातम्या आणखी आहेत...