आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर हॅट्ट्रिक केल्याने भारताने प्रो-लीग हॉकीच्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियावर 5-4 असा संस्मरणीय विजय मिळवला. हरमनप्रीतने सामन्याच्या 13व्या, 14व्या आणि 55व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय निश्चित केला. भारतासाठी इतर दोन गोल जुगराज सिंह (17व्या मिनिटाला) आणि कार्ती सेल्वम (25व्या मिनिटाला) यांनी केले. ऑस्ट्रेलियाकडून बेल्ट्झ जोशुआ, विलोट के, स्टॅन्स बेन, जलस्की अरन यांनी गोल केले.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला जोशुआच्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. मात्र एका मिनिटात जुगराज सिंह आणि हरमनप्रीत यांनी केलेल्या दोन गोलनंतर भारतीय संघाने मध्यंतरापर्यंत 4-1 अशी मोठी आघाडी घेतली.
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही तर ऑस्ट्रेलियाने विलोटच्या गोलने सामन्यात पुनरागमन केले.
चौथ्या क्वार्टरमध्ये स्टेन्सने केलेल्या गोलमुळे ऑस्ट्रेलियाने भारताची आघाडी कमी केली पण हरमनप्रीतने 55व्या मिनिटाला आणखी एक गोल करून भारताला 5-3 ने आघाडी दिली. झालेस्कीने केलेल्या गोलने ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सामन्याची उत्कंठा वाढवली. यानंतर पुढील चार मिनिटे दोन्ही संघांनी अथक परिश्रम घेतले मात्र एकही गोल होऊ शकला नाही. दोन्ही संघांना 10-10 पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी भारताने तीन आणि ऑस्ट्रेलियाने दोन गोल केले.
जानेवारीत झालेल्या विश्वचषकात खेळलेल्या अनेक खेळाडूंशिवाय ऑस्ट्रेलिया येथे आला आहे. सध्याच्या संघातील 20 पैकी आठ खेळाडूंनी 10 किंवा त्यापेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विश्वचषकात ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर होता.
भारतही विश्वचषक संघातील आठ खेळाडूंशिवाय खेळत आहे. यामध्ये आकाशदीप सिंग, मनदीप सिंग आणि नीलकांत शर्मा या ज्येष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. भारत सोमवारी दुसऱ्या सामन्यात जर्मनीशी भिडणार आहे आणि बुधवारी पुन्हा ऑस्ट्रेलियाशी सामना होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.