आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Harmanpreet Kaur's Best Innings, India's 333 For The Loss Of 5 Wickets Against England

वनडे:हरमनप्रीत कौरची सर्वोत्तम खेळी, भारताच्या इंग्लंडविरुद्ध 5 गडी गमावत 333 धावा

केंटरबरी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५ गडी गमावत ३३३ धावा केल्या. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने (१४३*) शतक ठोकले. तर हरलीन देओलने (५८) अर्धशतक केले. हरमनने वनडेत आपली दुसरी सर्वोत्तम धावसंख्या रचली. हा इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये महिला खेळाडूचा सर्वोच्च स्कोअर आहे. हरमनने यावर्षी आपले दुसरे वनडे शतक केले. ती २०२२ मध्ये वनडेत फॉर्मात आहे. १५ डावांत ७५० धावा केल्या. त्यात सरासरी ६२.५ आणि स्ट्राइक रेट ९०.२५ आहे. तिने पाच अर्धशतकही केले आहेत. हे तिचे पाचवे वनडे शतक आहे. टी-२० मध्येही तिने शतक केले आहे. तिने हरलीनसोबत चौथ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली. स्मृती मानधनाने ४० धावांचे योगदान दिले. तिने वनडेमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. आता मानधनाच्या ३०२३ धावा आहेत.

इंग्लंड दौऱ्यावरील महिला संघच आशिया चषकात खेळणार मुंबई | बीसीसीआयने बुधवारी आशिया चषकासाठी १५ सदस्यीय भारतीय महिला टी२० संघ जाहीर केला आहे. ही स्पर्धा १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत बांगलादेशात खेळली जाईल. संघात कोणताच बदल केलेला नाही. इंग्लंड दौऱ्यावर गेलेला संघच आशिया चषकात खेळणार आहे. सोलापूरची किरण नगगिरेला संघात स्थान देण्यात आले आहे. सहावेळचा चॅम्पियन भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मैदानावर उतरेल. संघ श्रीलंकेविरुद्ध १ ऑक्टोबरला आपल्या अभियानाची सुरुवात करेल. स्पर्धेत ७ संघ भाग घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...