आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Healy's All rounder Leads To Mumbai's Second Win; Bangalore Lose Second Match, Mumbai Beat Bangalore By 9 Wickets In 14.2 Overs

महिला प्रीमियर लीग:सामनावीर हेलीच्या अष्टपैलू खेळीने मुंबईचा दुसरा विजय; बंगळुरूने गमावला दुसरा सामना

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • , मुंबईची 14.2 षटकांत 9 गड्यांनी बंगळुरूवर मात

सामनावीर ऑलराउंडर हेली मॅथ्यूजने (३ बळी, नाबाद ७७ धावा) आपल्या अष्टपैलू खेळीतून मुंबई इंडियन्स संघाचा पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगमध्ये धडाकेबाज विजय साजरा केला. हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर साेमवारी लीगमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात स्मृती मानधनाच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा पराभव केला. मुंबई संघाने १४.२ षटकांत ९ गड्यांनी सामना जिंकला. यासह मुंबई संघाला लीगमध्ये सलग दुसरा माेठा विजय संपादन करता आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १८.४ षटकांत अवघ्या १५५ धावांवर आपला डाव गुंडाळावा लागला. प्रत्युत्तरात मुंबई संघाने ९ गडी आणि ३४ चेंडू राखून विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयात यस्तिका (२३) व ब्रंटने (नाबाद ५५) याेगदान दिले.

हेलीचे पहिले अर्धशतक साजरे विंडीजच्या २४ वर्षीय हेली मॅथ्यूजची पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने दुसऱ्या सामन्यातून लीगमध्ये अर्धशतकाचे खाते उघडले. तिने ३८ चेंडूंमध्ये १३ चाैकार व एका उत्तुंग षटकारातून नाबाद ७७ धावा काढल्या. तिचे गत सामन्यात गुजरात जायंट्स संघाविरुद्ध अवघ्या तीन धावांनी अर्धशतक हुकले हाेते. तसेच तिने दुसऱ्या सामन्यात ४ षटकांत २८ धावा देत तीन बळीही घेतले.

हेली-ब्रंटची ५६ चेंडूंमध्ये विजयासाठी अभेद्य ११४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी फाॅर्मात असलेल्या हेली मॅथ्यूज आणि ब्रंटने संघाचा झटपट विजय साजरा केला. यादरम्यान या दाेघींनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूंमध्ये तुफानी फटकेबाजी करताना ११४ धावांची अभेद्य महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यातून मुंबई इंडियन्सला १४.२ षटकांत विजय संपादन करता आला. यादरम्यान दाेघींनीही वैयक्तिक अर्धशतके साजरे केली आहेत. इंग्लंडच्या ब्रंटने पहिले अर्धशतक साजरे केले. तिने २९ चेंडूंत ९ चाैकार व १ षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...