आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्जेंटिनात सोमवारी आकाश नव्हे, तर जमीन निळ्या रंगात रंगली आहे. १२० मिनिटांच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात अप्रतिम विजय मिळाल्यापासून ४.६० कोटी लोकसंख्येचा देश झोपला नाही. निळी-पांढरी जर्सी घातलेल्या लोकांचा जल्लोष रविवारी रात्रीपासून सुरू झाला. मेसीचा संघ राजधानीत पोहोचत असल्याने संगीत, विजयी घोषणांचा आवाज मंगळवार पहाटेपर्यंत दुमदुमणार आहे. येथील प्रत्येक जण विश्वचषकाची झलक पाहण्यासाठी आतुर आहे. सर्वांना मॅराडोनाच्या १९८६ मधील विजयानंतर झालेल्या स्वागताचा विक्रम मोडायचा आहे. मेसीने निवृत्ती न घेण्याची घोषणा केल्याने सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
...इकडे पराभवानंतर फ्रान्समध्ये दंगल
फायनल हरल्यानंतर फ्रान्समध्ये दंगल उसळली आहे. पॅरिससह अनेक शहरांत लोकांनी पोलिसांवर हल्ले केले, जाळपोळ केली. अनेकांना ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.