आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:हिमानी परब सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांबमध्ये पुरस्कार जिंकणारी देशातील पहिली

औरंगाबाद / एकनाथ पाठक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर ठाण्याच्या हिमानी परबने क्रीडा पुरस्कारात विक्रमाचा झेंडा राेवला. मल्लखांबमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे तिचा शनिवारी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गाैरव करण्यात आला. हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू ठरली. तिने वयाच्या २० व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे. मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी हिमानी ही देशातील पहिली खेळाडू ठरली. महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या हिमानीने प्रावीण्य संपादन करत वयाच्या नवव्या वर्षी जर्मनीत युवकांना मल्लखांब प्रशिक्षण दिले.

पारंपरिक मल्लखांबची निवड कशी केली?
आवड, गुणवत्ता व स्ट्रेंथने खेळात सहज प्रावीण्य मिळवता येते. यासाठी ग्लॅमरच असावे असे काही नाही. मल्लखांबमध्ये दर्जेदार कामगिरीची क्षमता आहे हा विश्वास मला वाटला. प्रचंड मेहनतीतून सिद्ध झाले. वयाच्या पाचव्या वर्षी ठाण्यातील श्री समर्थ व्यायाम मंदिरमध्ये देशपांंडे यांच्यासह अस्मिता नायक यांनी मला प्रशिक्षण दिले.

मल्लखांबमध्ये काय बदल झाला?
सकारात्मक बदलाने मल्लखांब आता यासाठी खास इनडाेअर हाॅल तयार करण्यात आले. याशिवाय भारतासह मल्लखांंब खेळाचा जर्मनी, अमेरिका, जपानसारख्या देशातही वेगाने प्रसार झाला.

गुुणवत्ता कशी सिद्ध हाेते, इव्हेंट कसा हाेताे?
मल्लखांब हा लाकडी पाेलवरील खेळ आहे. प्रत्येक खेळाडूला आेरिजिनल एलिमेंट सादर करावा लागताे. प्रत्येक सेट (आसन) दीड मिनिटाचा असताे. यातून लवचिकता, टायमिंग, स्ट्रेंथ व परफाॅर्मन्समधून खेळाडूंना गुण दिले जातात.

महिला खेळाडूंची संख्या कशी?
यात करिअर करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक महिला खेळाडू आहे. देशात खेळाडूंची संख्याही वाढत आहे. २०१९ मध्ये मुंबईत वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली हाेती. आता महिलांनाही मल्लखांबवर कसरतीची परवानगी देण्यात आली. यापूर्वी फक्त राेपवर महिला खेळाडू आपले काैशल्य सादर करत हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...