आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवा दिन विशेष:खडतर वाटेवरून मिळाली टर्फवर स्वप्नपुर्तीची संधी, हाॅकीपटू अक्षता ढेकळेचा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास

सातारा (विजय मांडके)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युवादिनी फलटणच्या या गुणवंत खेळाडूच्या संघर्षमय प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला प्रकाशझाेत.

जिद्द अाणि चिकाटीसाेबतच प्रचंड मेहनत करण्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर फलटण तालुक्यातील वाखरीच्या युवा हाॅकीपटू अक्षता ढेकळेने अांतरराष्ट्रीय स्तरावरचा पल्ला यशस्वीपणे गाठला. तिला विदेश दाैऱ्यात चिली येथे भारताच्या युवा महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संंधी मिळाली अाहे. युवादिनी फलटणच्या या गुणवंत खेळाडूच्या संघर्षमय प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला प्रकाशझाेत.

शेतकरी फलटण तालुक्यातील वाखरी येथील अक्षता ढेकळे, आसू येथील वैष्णवी फाळके व ऋतुजा पिसाळ या तीन मुलींची निवड भारतीय मुलींच्या हॉकी संघामध्ये झाली असून त्या चिलीला जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर अक्षदा ढेकळे, तिची आई व तिचा भाऊ आनंद यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी आपल्या भावनांना आनंदाश्रूंनी वाट करून दिली. वाखरी येथील ढेरे यांचे कुटुंब आहे. प्राथमिक शिक्षण वाखरीमध्येच जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीपर्यंत झाले. तिसरीमध्ये असतानाच तिची हॉकीमध्ये तालुका, सर्व जिल्हा स्तरावर निवड झाली आणि बालेवाडी येथे हॉकीसाठी प्रशिक्षण सुरू झाले. याठिकाणी अाॅलिम्पियन अजित लाक्रा प्रशिक्षक तिला लाभले. पुण्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावला. यातून तिची भारतीय संघात निवड झाली.

शेतकरी कुटंुबीय; क्रीडा क्षेत्रात दबदबा
ढेकळे या शेतकरी कुटंुबाने क्रीडा क्षेत्राशी जुळलेली नाळ कायम ठेवली अाहे. हाच वारसा अाता अक्षता घेऊन अांतरराष्ट्रीय स्तरावर मार्गस्थ झाली अाहे. तिचे वडील राज्यपातळीवर कुस्ती खेळले. तिची एक बहीण राज्यपातळीवर बॉक्सिंगमध्ये खेळली आहे.आता अक्षता ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार असल्याने अानंद झाला, अशी प्रतिक्रिया तिच्या अाईने दिली.

बातम्या आणखी आहेत...