आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:12 ऑगस्ट 1948 रोजी इंग्रजांना ब्रिटनमध्येच पराभूत केले; बलबीर म्हणायचे - हाच माझा खरा स्वातंत्र्यदिन

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 61 सामन्यांत 246 गोल करणारे हॉकीपटू बलबीर यांनी ऑलिम्पिकमध्ये मिळवून दिली होती गोल्डन

हॉकी खेळाडू बलबीर सिंग सीनियर यांचे सोमवारी ९६ व्या वर्षी मोहालीत निधन झाले. ते २ आठवड्यांपासून रुग्णालयात होते. भारतासाठी ६१ सामन्यांत २४६ गोल करणारे बलबीर सीनियर लंडन (१९४८), हेलसिंकी (१९५२) आणि मेलबर्न (१९५६) ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या संघात होते. जागतिक ऑलिम्पिक समितीने इतिहासातील १६ महान खेळाडूंत त्यांचा समावेश केला होता. हॉकी संघाचे माजी कर्णधार वासुदेवन भास्करन आणि अशोक कुमार सांगताहेत की, त्यांना महान खेळाडू आणि मेंटॉर का मानले जाते...

माजी कर्णधार भास्करन म्हणाले

- त्यांचा फॉरवर्ड खेळण्याचा सल्ला एेकला, पुन्हा पटकावले सुवर्णपदक

हॉकीमध्ये शेवटचे सुवर्णपदक १९८० च्या ऑलिम्पिकमध्ये मिळवून देणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार वासुदेवन भास्करन म्हणाले, बलबीर यांनी अशा काळात देशाला यश दाखवले, जेव्हा निवडक खेळांमध्ये खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळायची. १९७० मध्ये विद्यापीठात खेळांदरम्यान त्यांची पतियाळात भेट झाली होती. एक तासाच्या सरावादरम्यान ते मला म्हणाले की, तू बराच आक्रमकपणे खेळतोस. सेंटर हाफशिवाय तुझ्यात फॉरवर्ड खेळण्याचे कौशल्य आहे. दोन्ही प्रकारे खेळल्यानंतरच तू परिपूर्ण खेळाडू होशील. मी त्यांचा सल्ला ऐकला आणि असेच केले. परिणामी आम्ही १९८० ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

चुकांमधून धडा घेत विश्वचषकच जिंकला - अशोककुमार

बलबीर यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अशोक ध्यानचंद यांनी सांगितले, मी पहिल्यांदा त्यांना १९७० च्या एशियन गेम्सच्या ट्रायलदरम्यान भेटलो. ते संघाचे मॅनेजर होते. फायनलमध्ये आमचा सामना पाकिस्तानसोबत होता. त्यांनी अशोक आणि गोविंदाला खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र वरिष्ठांनी ऐकले नाही आणि पराभव झाला नाही. १९७१ विश्वचषकातही मी त्यांच्यासोबत होतो. उपांत्य सामन्यात पुन्हा पाकिस्तानसोबत हरलो. त्या पराभवाचे कोच आणि मॅनेजर बलबीर दोघांना दु:ख होते. मात्र ते मुलांप्रमाणे रडत होते. यानंतर १९७६ विश्वचषकासाठी संघ निवडण्यात आला. फायनलपूर्वी ते आम्हाला मंदिर, गुरुद्वारा, मशीद आणि चर्चमध्ये घेऊन गेले. प्रार्थना उपयोगी येतात, असा त्यांचा विश्वास होता आणि आमचेही हेच मत होते. परिणामी आम्ही विश्वचषक जिंकला.

डोळे उघडल्यास तिरंगा दिसावा :

बलबीर सीनियर चंदिगड पीजीआयमध्ये दाखल असताना त्यांनी नातू कबीरला सांगून समोर तिरंगा लावायला सांगितला. कारण डोळे उघडल्यावर समोर तिरंगा दिसावा. ते स्वातंत्र्य दिनही १२ ऑगस्ट १९४८ मानायचे. कारण तेव्हा त्यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले होते.

बातम्या आणखी आहेत...