• Home
  • Sports
  • Hockey team practice despite fears of corona virus; F One Driver's e League Preferred

काेराेना व्हायरसच्या भीतीनंतरही हाॅकी टीमचा सराव; एफ-वन ड्रायव्हरची ई-लीगला पसंती

  • भारतीय महिला आणि पुरुष संघांचे खेळाडू करत आहेत साईत सराव 

वृत्तसंस्था

Mar 22,2020 09:13:00 AM IST

बंगळुरू - कोरोना व्हायरसच्या भीतीने सध्या सगळीकडे शटडाऊन केले जात आहे. अशा प्रकारचे भीतीचे प्रचंड वातावरण असताना बंगळुरू येथील साई सेंटरमध्ये ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सध्या भारताचे महिला आणि पुरुष हाॅकी संघाचे खेळाडू कसून मेहनत घेत आहेत.


क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सध्या सर्वच ठिकाणच्या स्पर्धा आणि सराव रद्द करण्याची घाेषणा केली आहे. मात्र, ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या भारतीय हाॅकी संघाने आपला सराव कायम ठेवला आहे. जुलैमध्ये जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आहे.


सात रेस झाल्या रद्द; जूनमध्येच सर्किटवर धावणार कार

कोरोना व्हायरसचा धाेका लक्षात घेऊन आता फाॅर्म्युला वनच्या सात रेस रद्दची घाेषणा करण्यात आली. त्यामुळे आता जूनमध्येच सर्किटवर कार धावताना दिसणार आहेत. ७ जून राेजी अझरबैजान येथे रेस हाेणार आहे. काेराेनाचा धाेकाही कमी हाेईल, अशी शक्यता आयाेजकांनी वर्तवली.


टेनिसपटू पुरव व जीवन फावल्या वेळात बिझनेसमध्ये सक्रिय

भारतीय पुरुष टेनिसपटू जीवन आणि पुरव राजाने काेराेना व्हायरसमुळे सरावाला सुटी दिली आहे. याशिवाय अनेक स्पर्धा रद्द झाल्याने त्यांना फावला वेळ मिळाला आहे. यातूनच त्यांनी आपापल्या कुटुंबीयांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी कंबर कसली आहे. यातूनच पुरव हा सध्या मुंबई येथे नव्याने सुरू केलेल्या रॅकेट कस्टमाइजमध्ये गुंतलेला आहे. तसेच जीवनने नव्याने बॅडमिंटन, टेनिस काेर्ट सुरू केले आहे. यासाठीच ताे काम करत आहे.

X