आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक दर्जाचे २८८ हाॅकीपटू येत्या १३ जानेवारीपासून आेडिशातील भुवनेश्वर आणि राऊरकेलामधील मैदानावर आपले काैशल्य सादर करणार आहेत. भारत सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हाॅकी स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारतामध्ये १३ ते २९ जानेवारीदरम्यान हाॅकी वर्ल्डकपचे आयाेजन करण्यात आले. १५ व्या सत्रातील हाॅकी विश्वचषक स्पर्धेचे सामने आता दाेन शहरांमध्ये हाेणार आहेत. ५१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हाॅकी वर्ल्डकप दाेन शहरांमध्ये हाेणार आहे. यातून आता आंतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशन (एफआयएच) आपला ट्विन सिटीचा प्रयाेग साकारणार आहे. या स्पर्धेत जगभरातील १६ हाॅकी संघ सहभागी झाले आहेत. येत्या २९ जानेवारीपर्यंत कलिंगा आणि बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जवळपास ४४ सामने हाेणार आहेत. यजमान भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर विश्वविजेता हाेण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने १९७५ मध्ये हा बहुमान मिळवला हाेता. त्यानंतर भारतीय संघ सातत्याने अपयशी ठरत आहे. मात्र, आता घरच्या मैदानावर हा पल्ला गाठण्याची यजमान भारताला माेठी संधी आहे. भारतामध्ये २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यादरम्यान बेल्जियम संघाने किताब पटकावला हाेता.
भारतासमाेर स्पेनचे आव्हान यजमान भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या माेहिमेला पहिल्याच दिवशी सुरुवात करणार आहे. यातून भारताचा सलामी सामना स्पेनशी हाेणार आहे. १३ जानेवारी राेजी हे दाेन्ही संघ समाेेरासमाेर असतील. त्यानंतर भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना १५ जानेवारी राेजी इंग्लंड आणि १९ जानेवारी राेजी वेल्सशी हाेणार आहे. यादरम्यान भारतीय संघाची कामगिरी सध्या सर्वाेत्तम ठरत आहे. यातून टीमची नजर अव्वल स्थान गाठण्यावर लागली आहे.
१६ संघांची चार गटांत विभागणी; टाॅप संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत भारतात हाेणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जगभरातील १६ हाॅकी संघ सहभागी झाले आहेत. या संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली. यातील प्रत्येक गटात चार संघांचा समावेश असेल. गटातील टाॅप संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता येईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ दुसऱ्या गटातील याच स्थानावरील संघांविरुद्ध क्राॅस आेव्हर सामने खेळणार आहेत. विजेत्यांना अंतिम आठमधील प्रवेश निश्चित करता येईल.
यशस्वी पाक संघ यंदा अपयशी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान हाॅकी संघाला सर्वात यशस्वी मानले जाते. या संघाच्या नावे चार वेळा विश्वविजेता हाेण्याचा बहुमान आहे. तसेच या संघाने दाेन वेळा उपविजेतेपदही पटकावले. पाकिस्तान संघ गतवर्षी आशिया कप हाॅकी स्पर्धेत टाॅप-४ मध्येही स्थान मिळवू शकला नाही.
बेल्जियम सर्वात अनुभवी; भारत तिसऱ्या स्थानी {विश्वचषकात सहभागी बेल्जियम संघ सर्वात अनुभवी मानला जाताे. {संघात सहभागी १८ खेळाडू खेळले आतापर्यंत ४१२६ सामने. {भारतीय संघ २२८९ सामन्यांसह तिसऱ्या स्थानी.
संघ सामने बेल्जियम 4126 ऑस्ट्रेलिया 2632 भारत 2289 मलेशिया 2105 इंग्लंड 1871
दर्जेदार खेळाडंूमुळे यजमान दावेदार : तिर्की
यजमान भारतीय संघामध्ये अनेक स्टार हाॅकीपटू आहेत. तसेच संघाच्या कामगिरीचा दर्जाही उंचावलेला आहे. यातूून यजमान संघ यंदा किताबाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यामुळे भारतीय संघाला ४७ वर्षांनंतर विश्वविजेता हाेण्याची माेठी संधी आहे, अशा शब्दांत हाॅकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी यजमान संघाचे खास काैतुक केले.
विदेशी हाॅकीपटूंसाठी खास सजावट
१६ संघांच्या हाॅकीपटूंच्या स्वागतासाठी भुवनेश्वरमध्ये सजावट करण्यात आली आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्यावर ५१ मूर्ती लावण्यात आल्या. याशिवाय फुलांच्या सजावटीशिवाय भिंतींनाही रंगवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.