आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफॉरवर्ड मेम्फिस डीपे (१० वा मि.), मिडफील्डर डेली ब्लाइंड (४५+१ वा मि.) आणि मिडफील्डर डेनजेल डमफ्रीजने (८१ वा मि.) आपल्या हाॅलंंड संघाला फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. यासह हाॅलंड हा अंतिम आठमधील प्रवेश निश्चित करणारा पहिला संघ ठरला आहे. हाॅॅलंड संघाने शनिवारी बाद फेरीमध्ये अमेरिका संघावर मात केली. हाॅलंड टीमने ३-१ अशा फरकाने दणदणीत विजयाची नाेंद केली. यासह टीमला आपला अंतिम आठमधील प्रवेश निश्चित करता आला. हाॅलंड संघाने करिअरमध्ये पाचव्यांदा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला आहे. अमेरिका संघाने दमदार सुरुवात करताना सामन्यादरम्यान शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वाधिक ५९ टक्के चेंडूवर पझेशन मिळवले हाेते. मात्र, तरीही टीमला सामन्यात एकच गाेल करता आला. राइटने ७६ व्या मिनिटाला हाॅलंडच्या डिफेन्सला भेदून गाेल केला. मात्र, इतर खेळाडूंच्या सुमार खेळीने अमेरिकेला पराभवाचा सामना करावा लागला. यासह टीमचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.हाॅलंड संघ आता १० डिसेंबर राेजी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आता या विजयाने हाॅलंड संघाने आगेकूचचा दावा मजबूत केला आहे.
ब्राझील संघ विक्रमी १७ व्यांदा बाद फेरीत; आता द. काेरियाविरुद्ध लढत कर्णधार विन्सेंटने (९०+२ वा मि.) आपल्या कॅमेरून संघाला पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलवर १-० ने विजय मिळवून दिला. टीमला या विजयासह स्पर्धेचा शेवट गाेड करता आला. ब्राझील संघाने विक्रमी १८ व्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता ब्राझील संघाचा सामना दक्षिण काेरियाशी हाेणार आहे.
स्वित्झर्लंड आठव्यांदा बाद फेरीत शेरदान शकिरी (२० वा मि.), स्ट्रायकर ब्रील एम्बाेलाे (४४ वा मि.) आणि मिडफील्डर रेमाे फ्रयुलरने (४८ वा मि.) गाेल करून स्वित्झर्लंड संघाला बाद फेरी गाठून दिली. या गाेलच्या बळावर संघाने रंगतदार सामन्यात सर्बियावर मात केली. स्वित्झर्लंड संघाने ३-२ ने सामना जिंकला. सर्बियाकडून मित्राेविक (२६ वा मि.) आणि व्लाहाेविकने (३५ वा मि.) प्रत्येकी एक गाेल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.