आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीग:हॉलंड सत्रात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, मँचेस्टर सिटी 3-0 गोलने जिंकली

मँचेस्टर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्वेचा फुटबॉलपटू अर्लिंग हॉलंडला त्याच्या सहकाऱ्यांनी “मॉन्स्टर’ किंवा “बीस्ट’ म्हटले आहे. कारण हॉलंड जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा तो काही ना काही विक्रम नक्कीच करतो. आता एका मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मँचेस्टर सिटीच्या २२ वर्षीय हॉलंडने चॅम्पियन्स लीगमध्ये गोल केला. चालू सत्रात त्याने ४५ गोल केले आहेत. प्रीमियर लीगच्या खेळाडूने सर्व स्पर्धांमध्ये एका सत्रात सर्वाधिक गोल करण्याचा हा विक्रम आहे. हॉलंडने रुड व्हॅन निस्टेलरॉय व मोहंमद सलाह यांचा विक्रम मोडला. मँचेस्टर युनायटेडच्या निस्टेलरॉयने २००२-०३ मध्ये एकूण ४४-४४ व लिव्हरपूलच्या सलाहने २०१७-१८ हंगामात एकूण ४४-४४ गोल केले. संघाने मँचेस्टर सिटीच्या घरच्या इतिहाद स्टेडियमवर जर्मन क्लब बायर्न म्युनिचला ३-० ने हरवले.

45 वा गोल केला अर्लिंग हॉलंडने चालू सत्रात. आतापर्यंत ३९ सामने खेळले आहेत. हाॅलंंडचे ४ लीगमध्ये गोल, सर्वाधिक ईपीएलमध्ये लीग गोल प्रीमियर लीग 30 चँम्पियन्स लीग 11 एफए कप 3 लीग कप 1

इंटर मिलानने बेनफिकाला त्यांच्याच मैदानावर हरवले