आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरा टी-20:घरच्या मैदानावर टीम इंडियाचा सर्वात माेठा पराभव, दक्षिण आफ्रिका 49 धावांनी विजयी

इंदूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालिका पराभवातून सावरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने मंगळवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात यजमान टीम इंडियाला ४९ धावांनी पराभवाची धुळ चारली. दक्षिण आफ्रिका संघाने शेवटच्या सामन्यात भारताचा १८.३ षटकांत १७८ धावांत खुर्दा उडवला.यासह भारताचा घरच्या मैदानावर सर्वात माेठा पराभव झाला. बावुमाच्या नेतृत्वात आफ्रिका संघाने मालिकेत एकमेव विजयाची नाेंद केली. मात्र, भारताने सलग दाेन विजयासह ही तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. सलामीवीर क्विंटन डिकाॅक (६८) आणि राेसाेवच्या (नाबाद १००) झंझावाताच्या बळावर आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना तीन गड्यांच्या माेबदल्यात २२७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १८.३ षटकांत १७८ धावांवर आपला गाशा गुंडाळला. भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. कर्णधार राेहित शर्मासह (०) इतर फलंदाजांना फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवता आले नाही. त्यामुळे टीमचा विजयी हॅटट्रिकचा प्रयत्न अपुरा ठरला. दक्षिण आफ्रिका संघाकडून तिसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचे साेने करत प्रिस्टाेरियसने ३, पार्नेल, महाराज व एनगिडीने प्रत्येकी २ बळी घेतले.

शेवटच्या टी- २० सामन्यासाठी यजमान भारतीय संघाने तीन माेठे बदल केले. मालिका विजयामुळे आता माजी कर्णधार विराट काेहली आणि सलामीवीर लाेकेश राहुलला विश्रांती देण्यात आली. तसेच दुखापतीमुळे युवा वेगवान गाेलंदाज अर्शदीप सिंगला बाहेर करण्यात आले. त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. संघात श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहंमद सिराजला संधी मिळाली. उमेश यादवने एक बळी घेतला.

डिकाॅकच्या भारतविरुद्ध २ हजार धावा पुर्ण सलामीच्या डिकाॅकने करिअरमध्ये टीम इंडियाविरुद्ध चाैथे अर्धशतक साजरे केले. तसेच आता त्याच्या भारतीय संघाविरुद्ध २ हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. तसेच करिअरमध्ये १३ वे अर्धशतक झळकावले.

बातम्या आणखी आहेत...