आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी क्रिकेट:यजमान बांगलादेश संघ 15 महिन्यांनंतर कसाेटीत विजयी; आयर्लंड टीमचा पराभव

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान बांगलादेश संघाने शुक्रवारी घरच्या मैदानावर आयाेजित कसाेटी सामन्यात पाहुण्या आयर्लंड टीमचा पराभव केला. बांगलादेश संघाने ७ गड्यांनी विजय संपादन केला. यासह बांगलादेश टीमला १५ महिन्यांनंतर कसाेटीत विजयाची नाेंद करता आली. आयर्लंड संघाला आपला दुसरा डाव २९२ धावांवर गुंडाळावा लागला. यामुळे बांगलादेश टीमला विजयासाठी १३८ धावांचे टार्गेट मिळाले हाेते. यजमान बांगलादेश संघाने ३ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. यासह बांगलादेश टीमने दीड वर्षानंतर कसाेटीत विजय साजरा केला. यापूर्वी बांगलादेश संघाने गतवर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंड टीमविरुद्ध कसाेटी सामना ८ गड्यांनी जिंकला हाेता. त्यानंतर आता बांगलादेश संघाला कसाेटी विजयाचे माेठे यश मिळाले.