आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर नजमुल हुसेनने (५१ धावा, ३ झेल) सर्वाेत्तम कामगिरीतून बांगलादेश संघाला घरच्या मैदानावर वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला. बांगलादेश संघाने सलामीच्या टी-२० सामन्यात १८ षटकांत इंग्लंडवर ६ गड्यांनी विजयाची नाेंद केली. यासह यजमान संघाने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा निर्णायक रविवारी मीरपूरच्या मैदानावर हाेणार आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ६ बाद १५६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने चार गड्यांच्या माेबदल्यात १२ चेंडू राखून विजयश्री खेचून आणली. विजयात कर्णधार शाकीब (नाबाद ३४) आणि इफफ हुसेनने (नाबाद १५) माेलाचे याेगदान दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.