आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Hosts Maharashtra Women's Team Champions For The Second Time In A Row, Women's Team Beat Aviation Authority In The Final

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा:यजमान महाराष्ट्र महिला संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, महिला संघाची फायनलमध्ये विमान प्राधिकरणावर मात

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

प्रियांका इंगळे (३.३० मिनिटे व २गुण), अपेक्षा सुतार ( २.२o व १.१० मिनिटे व १गुण) यांनी अष्टपैलू खेळीतून यजमान महाराष्ट्र महिला संघाला चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळवून दिला. रेश्मा राठाेडच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ५५ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिला गटाचा किताब पटकावला. यजमान महाराष्ट्र संघाने फायनलमध्ये तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात भारतीय विमान प्राधिकरण संघावर ११-९ अशी डावाने मात केली. महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीनेच संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. पूजा फरगडे हिने ४ गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसऱ्या डावात रेश्मा राठोड २.२० व दीपाली राठोड हिने २.३० मिनिटे संरक्षण केले. प्राधिकरणकडून वीणा (१.१० मिनिटे नाबाद), ऋतुजाने (१.२० मिनिटे), जान्हवीने (१.०० मिनिटे व १गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली. महाराष्ट्र पुरुष संघ दुसऱ्यांदा उपविजेता;अंतिम फेरीत पराभव यजमान महाराष्ट्र संघ सलग दुसऱ्यांदा उपविजेता ठरला. भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर १४-१२ असा ४५ सेकंद राखून विजय मिळवत हॅट‌्ट्रिक केली. रेल्वेचे हे ११वे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून रेल्वेने संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने पहिल्या आक्रमणात ६ गडी बाद केले. रेल्वेने ७ गडी बाद करीत मध्यंतरास एका गुणाची निसटती आघाडी घेतली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही ६ गडी टिपले. विजयासाठी रेल्वेला ६ गुण मिळवायचे होते. रेल्वेकडून अक्षय गणपुले (२.०० व १.३० मिनिटे), महेश शिंदे (१.५० व १.४० मिनिटे व २ गुण),अमित पाटील (१.३० मिनिटे व १गुण), विजय हजारे (१.१० मिनिटे), मिलिंद चौरेकर ३ गुण यांनी शानदार खेळी केली. महाराष्ट्रकडून रामजी कश्यप (१.४० व १.३० मिनिटे व १गुण), प्रतीक वाईकर ( १.५० मिनिटे), अक्षय भांगरे (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी लढत दिली.

अपेक्षा, अक्षयला पुरस्कार सर्वाेत्तम कामगिरीमुळे अपेक्षा सुतार राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची मानकरी तर अक्षय गणपुले एकलव्य पुरस्काराचा मानकरी ठरला. पारितोषिके विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर, आमदार श्रीकांत भारतीय, कल्याणराव काळे, विभागीय व्यवस्थापक दत्तात्रय कावेरी, अभिनेत्री किरण डहाणे, महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...